बेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…

पपई पोटासाठी खूपच गुणकारी असते आणि हि खाल्ल्याने पोटासंबंधित अनेक आजार लवकर बरे होतात. आरोग्याशिवाय पपई त्वचेसाठी देखील खूपच उत्तम मानली जाते.

आणि याच्या मदतीने त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पपईचा प्रयोग अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. कारण या फळामध्ये असेलेले घटक त्वचेवर प्रभावी ठरतात.

पपईचा फेस पॅक सहजरित्या घरामध्ये तयार केला जाऊ शकतो आणि या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यासंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया पपईचा फेस पॅक कशाप्रकारे बनवावा आणि यासंबंधी फायदे.

पपई फेस पॅक बनवण्याची पद्धत

डाग धब्बे गायब करण्यासाठी

पपई व्यवस्थित सोलून घ्यावी आणि तिची पेस्ट बनवावी. आता यामध्ये टोमॅटोचा रस घाला. या दोन्ही गोष्टींना एकत्र मिक्स करून घ्या. हे पॅक आठवड्यामधून तीन दिवस लावावे. हे पॅक लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतील.

त्वचा मुलायम बनवण्यासाठी

पपईच्या पेस्टमध्ये कच्चे दुध मिसळून घ्या आणि फेस पॅक तयार करा. हि पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर चांगली लावावी आणि थोडा वेळ ती सुखु द्यावी नंतर थंड पाण्याने चेहरा आणि गळा चांगला धुऊन घ्यावा. हि पेस्ट लावल्याने त्वचा मुलायम बनून राहील आणि चेहऱ्यावर निखार येईल. वास्तविक, पपईमध्ये पोटॅशियम असते जे त्वचेचा कोरडेपणा दूर करते.

सुरकुत्या दूर करण्यासाठी

चेहऱ्यावर सुरुकुत्या आल्या असतील तर पपईमध्ये अॅेलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवून घ्यावी आणि हि पेस्ट एक महिना रोज लावावी. हि पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि चेहरा तरुण दिसू लागेल. पपई अँटिऑक्सिडेंट सारखे काम करते आणि सुरकुत्या दूर करते.

मुरूम दूर करण्यासाठी

चेहऱ्यावर मुरूम आले असल्यास पपई, मध आणि लिंबू एकत्र करून याचा फेस पॅक तयार करा. पपईचे छोटे छोटे तुकडे करून ते बारीक वाटून घ्यावेत आणि यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळावा. हा पॅक चेहऱ्यावर लावावा. १५ मिनिटाने पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. दररोज हा पॅक लावल्याने मुरुमांच्या समस्येतून मुक्तता मिळेल आणि ते मुळांपासून दूर होतील.

त्वचेचे छिद्र भरण्यासाठी

पपई चांगली वाटून यामध्ये अंड्याचा पांढरा हिस्सा घाला. या दोन्ही गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. हे पॅक चेहऱ्यावर कमीत कमी १५ मिनिटे लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. हे पॅक लावल्याने त्वचेची छिद्र भरण्यास मदत होईल.

तेलकट त्वचेसाठी

पपईच्या पेस्टमध्ये संत्र्याचा रस घालून फेस पॅक बनवून घ्या. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटे राहू द्यावा आणि जेव्हा तो सुखेल त्यावेळी पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. हि पेस्ट लावल्याने तेलकट त्वचेपासून आराम मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *