मुळशी पॅटर्न चित्रपट तर आपण सर्वांनी पाहिलाच असेल. या चित्रपटामधील अभिनेत्रीच्या कामाचे खूपच कौतुक झाले होते.
या अभिनेत्रीचे नाव मालविका गायकवाड असून तिने या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.
मालविकाचा हा पहिलाच चित्रपट असून कोणतीही अभिनय पार्श्वभूमी नसताना या भुमिकेमुळे ती रातोरात लोकप्रिय झाली.
विशेष म्हणजे मालविका हि बडोदा येथील गायकवाड घराण्याची राजकन्या असून तिच्या आईचे माहेर आणि आजोळ पुणे आहे. लग्न झाल्यानंतर ते बडोद्याला शिफ्ट झाले तर तिचे वडील सौदी अरेबियामध्ये कामाला होते.
मालविकाची आई सुशिक्षित असून त्यांचे शिक्षण एसपी कॉलेजमधून झाले होते यामुळे आपल्या मुलीने विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातूनच शिक्षण घ्यावे अशी तिची खूपच इच्छा होती.
यामुळे मालिका आपल्या कुटुंबाबरोबर पुण्यामध्ये स्थायीक झाली. पुण्यामधील सिंहगड कॉलेज येथून तिने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने बराच काळ आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरीदेखील केली.
तिचे वडील हे मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्यामुळे तिला शेतकऱ्यांच्या समस्यांच्या प्रती सहानुभूती निर्माण झाली. पेपरमधील रोजच्या बातम्या वाचून तिने शेतकऱ्यांच्या समस्या अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यातूनच तिला शेतीमध्ये आवड निर्माण होऊ लागली. द ऑरगॅनिक कार्बन या शेतीसंबंधी संस्थेची स्थापना करून ती अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी जागरूक करू लागली. यादरम्यान तिला मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
नुकतेच अभिनेत्री मालविका गायकवाडने आपल्या लग्नाचे प्रिवेडिंग शूट करून सिड कि मालू असे कॅप्शन देऊन ते फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.
तिच्या चाहत्यांनीदेखील हे फोटोदेखील खूपच पसंत केले आहेत. मालविकाने आपल्या लग्नाच्या अगोदर बॅचलर पार्टी देखील साजरी केली आहे ज्यामध्ये तिने आपल्या सर्व मित्र मैत्रीणीना आमंत्रित केले होते.
याशिवाय मालविकाने आपल्या मेहेंदी सेरेमनी आणि हळदीचे फोटोदेखील सोशल मिडीयावर शेयर केलेले पाहायला आहेत.
सिद्धार्थ सिंघवी या आपल्या मित्रासोबतच ती काही दिवसांपूर्वी विवाह बंधनामध्ये अडकली आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओदेखील तिने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट वरून चाहत्यांसोबत शेयर केला आहे.
मालविका आणि सिद्धार्थ सिंघवी यांचा हा विवाहसोहळा अगदी दिमाखदार आणि राजेशाही थाटामध्ये पार पडला. मालविका आणि सिद्धार्थ यांना आमच्या टीमकडून देखील आयुष्याच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.