कोणी होत बस कंडक्टर तर कोणी वेट्रेस, जाणून घ्या फेमस होण्याअगोदर काय काम करत होते हे 13 कलाकार…

बॉलिवूड मध्ये असेही काही स्टार्स आहेत ज्यांचा प्रवास शून्यापासून सुरु झाला आहे. आज आपण अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेऊया. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यापूर्वी आपल्या सर्वांचे आवडते स्टार्स काय करायचे हे या लेखात आम्ही आपणास सांगणार आहोत.

१. सोनम कपूर:-

आज लोक सोनम कपूरला फॅशन क्वीन म्हणून ओळखतात. पण जेव्हा सोनम तिच्या अभ्यासाच्या संदर्भात सिंगापूरमध्ये होती तेव्हा तिला पॉकेटमनी खूप कमी मिळत असे. पॉकेटमनी कमी असल्याने सोनमने तेथील एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम केले. सिमी ग्रेवाल यांच्या इंटरव्यू दरम्यान तिने हे सांगितले आहे.

२. रणवीर सिंग:-

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी रणवीर एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करायचा. ही जाहिरात एजन्सी मुंबईत होती त्यामध्ये तो कॉपीरायटरच्या पोस्टवर होता. रणवीरला त्याचा दिग्दर्शक मित्र मनीष शर्मा याने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले होते.

३. सोनाक्षी सिन्हा:-

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा चित्रपटांत दिसण्यापूर्वी कॉस्ट्यूम डिझाइनर होती. २००५ मध्ये आलेल्या मेरा दिल लेके देखो या चित्रपटाची कॉस्ट्यूम डिजाईन सोनाक्षीने केली होती.

४. अरशद वारसी:-

पूर्वी अरशद वारसीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तर तो पैसे मिळवण्यासाठी घरोघरी कॉस्मेटिक्स विकत असे. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्याने सेल्समन म्हणून काम करण्यास सुरवात केली होती.

५. नवाजुद्दीन सिद्दिकी:-

नवाज चा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याने काही काळ वडोदरामध्ये केमिस्ट म्हणून काम केले. नंतर तो दिल्लीला आला आणि एका थिएटर ग्रुपचा भाग झाला. पण जास्त पैसे मिळत नसल्यामुळे त्याला वॉचमैन म्हणून देखील काम करावे लागले होते.

६. जॉनी लीवर:-

आपल्या कॉमेडीने सर्वांना गुदगुल्या करणारा जॉनी लीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकत असे. १९८१ सालच्या डर का रिश्ता या चित्रपटाद्वारे पदार्पण केल्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.

७. शाहरुख खान:-

किंग खान शाहरुख खान बद्दल कोणाला माहिती नाही कि तो प्रसिद्ध होण्यापूर्वी कॉन्सर्ट अटेंडर म्हणून काम करायचा. पंकज उधास यांच्या लाइव कॉन्सर्टसाठी शाहरुखला ५० रुपये फी दिली गेली होती.

८. आर माधवन:-

रहना है तेरे दिल में या चित्रपटाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळविणा मॅडी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर आहे. पण त्याचे स्वप्न नेहमी अभिनेता व्हायचे होते. त्यावेळी माधवन अनेक कोचिंग सेंटर आणि कॉलेजेसमध्ये कम्युनिकेशन स्किल्स शिकवत असत.

९. जॉन अब्राहम:-

जॉन अब्राहमकडे एमबीए डिग्री आहे. जॉनने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. अभिनयापूर्वी जॉन एका मीडिया एन्टरटेन्मेंट कंपनीत काम करायचा. तो मीडिया प्लानर देखील होता.

१०. रजनीकांत:-

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात मोठे सुपरस्टार रजनीकांत चित्रपटात येण्यापूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करायचे. बसमध्ये तिकिट कापण्याच्या शैलीने प्रभावित होऊन एका दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटांमध्ये संधी दिली.

११. बोमन इराणी:-

आपल्या अभिनयाची खात्री पटवून देणारा बोमन चित्रपटात येण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करायचा. त्याने ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस अटेंडंर म्हणून काम केले आहे.

१२. परिणीती चोप्रा:-

चित्रपटात येण्यापूर्वी परिणीतीने यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग इंटर्नशिप केली होती. बॅंड बाजा बारात या चित्रपटातील परिणीतीच्या कामाचे खूप कौतुक झाले.

१३. दिलीप कुमार:-

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार चित्रपटात येण्यापूर्वी फळांची विक्री करीत असत. यानंतर त्यांनी काही काळ कॅन्टीनही चालवली. नंतर देविका राणीने त्यांना ज्वार भाटा चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली.

मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हे आर्टिकल आवडल असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment