औषधीय गुणांनी परिपूर्ण आहे कडुलिंबाचे पाणी, रोज हे पाणी पिल्याने दूर होतात हे घातक रोग

आयुर्वेदामध्ये अनेक झाडांचा उल्लेख केला गेला आहे जे कि औषधीय गुणांनी भरपूर आहेत आणि या झाडांची मुळे, साल, फळ आणि पानांचा प्रयोग औषधे बनवण्यासाठी वापर केला जातो.

आयुर्वेदातही कडुलिंबाच्या झाडाचा उल्लेख करण्यात आला आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाला सर्वरोग निवारिणी या नावाने ओळखले जाते.

ज्याचा अर्थ सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण करणारा असा होतो. आजच्या काळामध्ये अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने आणि औषधे बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो.

कडुलिंबामध्ये एंटीबायोटिक तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि हे तत्व रोगांना दूर ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. रोज कडुलिंबाचे सेवन केल्यास संक्रमण, जखमा आणि फंगल इंफेक्शनपासून रक्षण होते. यासाठी तुम्ही रोज कडुलिंबाची पाने अवश्य खावीत आणि याचे पाणी देखील प्यावे.

कडुलिंबाचे फायदे

रक्त शुद्ध होते

रक्त शुद्ध नसेल तर त्वचेवर मुरूम येतात. जर तुम्हालाहि मोठ्या प्रमाणात मुरुमांचा त्रास असेल तर समजून जा कि तुमचे रक्त देखील अशुद्ध आहे आणि रक्त शुद्ध करण्यसाठी रोज कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.

कडुलिंबाचे पाणी पिल्याने रक्त एकदम शुद्ध होते. कडुलिंबाचे पाणी तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने एका ग्लासमध्ये उकळून घ्यावीत.

जेव्हा या पाण्याचा रंग हिरवा होईल तेव्हा हे पाणी गाळून घ्यावे आणि हे पाणी थंड करून घ्यावे. कडुलिंबाचे पाणी दररोज सकाळी प्यावे. तुम्हाला हवे असेल तर पाण्यासोबत मध देखील खाऊ शकता. हे पाणी पिल्याने रक्त शुद्ध होण्याबरोबरच हार्मोनची पातळी देखील ठीक होते.

दुखण्यापसून आराम मिळतो

कडुलिंब वेदनानाशक देखील आहे आणि कडुलिंबाच्या तेलाने मालिश करण्याने दुखण्याच्या त्रासापासून देखील मुक्ति मिळते. सांधे किंवा स्नायू दुखत असतील तर कडुलिंबाच्या तेलाने मालिश करावी.

कडुलिंबाच्या तेलाने मालिश केल्याने वेदनेपासून आराम मिळतो. थोडेसे कडुलिंबाचे तेल दुखण्याच्या ठिकाणी लावावे आणि २ मिनिटे या तेलाने मालिश करावी. यानंतर एक कपडा बांधावा. तुम्हाला लवकरच वेदनांपासून आराम मिळेल.

मधुमेह दूर होतो

मधुमेहासाठी कडुलिंब खूपच जालीम उपाय आहे. कडुलिंबाचे पाणी पिल्याने हा रोग दूर होतो आणि रक्तामधील साखरेची पातळी सुधारते.

मधुमेहाच्या रोगीने रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास कडुलिंबाचे पाणी प्यावे. हे पाणी एक दिवस सोडून पीले पाहिजे. वास्तविक, कडुलिंबामध्ये हाईपोग्लासेमिक गुणधर्म असतात जे रक्तामधील साखरेचे कण कमी करण्यास मदत करतात.

चेहरा तजेलदार बनवते कडुलिंब

कडुलिंबाच्या पाण्याने दररोज चेहऱ्या धुतल्याने चेहरा तजेलदार बनतो. याशिवाय कडुलिंबाचे फेस पॅक तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यावीत आणि त्यामध्ये थोडासा मध घालून नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा.

Leave a Comment