5 वर्षाची हि मुलगी दररोज संध्याकाळी घरातून व्हायची गायब म्हणून एक दिवस वडिलांनी केला पाठलाग तर समोर आली हि सच्चाई…’

आपल्याला माहित आहे की लहान मुलांना देवा घरची फुले असे म्हटले जाते आणि त्यामुळेच लहान मुले खूप दयाळू आणि निर्दोष असतात. या लहान मुलांमध्ये असंख्य प्रेम आणि माणुसकी असते आणि त्यामुळेच ते स्वतःहून सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात.

आता एका पाच वर्षाच्या मुलीसोबत ही असेच काही घडले आहे. आपल्याला सांगू इच्छितो की ही मुलगी दररोज संध्याकाळी जेवणानंतर घरातून गायब व्हायची. ज्याबद्दल त्या मुलींच्या पालकांना काहीही माहिती नव्हते आणि असेच एकदा ही मुलगी सुमारे तीन-चार दिवस तिच्या आई वडिलांना रात्रीची खोलीत सापडली नाही.

तेव्हा त्यांनी त्या मुलीचा पाठलाग करण्याचा विचार केला. ही मुलगी दररोज संध्याकाळी 1 तासासाठी घरातून गायब व्हायची.पण जेव्हा तिच्या वडीलानी म्हणजेच टॉमने तिचा पाठलाग केला तेव्हा त्याला सत्य कळले ज्यामुळे तो अश्यर्यचकित झाला.

त्यानंतर टॉमने पोलिसांना आणि मीडिया चॅनेलशी बोलताना माहिती दिली की, आपली लहान मुलगी एम्मा हे सर्व गुप्तपणे कसे करू शकली.

मुलीला एकट्याने येण्याची चिठ्ठी मिळाली:-

जेव्हा टॉम आणि त्याची पत्नीच्या हे लक्षात आले की त्यांची मुलगी रात्रीची घरातून गायब असते, तेव्हा त्यांनी याबद्दल आपल्या मुलीला म्हणजेच एम्माला विचारले. मात्र, या मुलीने त्यांना याबद्दल काहीही सांगितले नाही.

पण जेव्हा एम्मा सलग पाचव्या दिवशी घरातून बाहेर पडली तेव्हा टॉमने तिच्या खोली शोध घेतला आणि टॉमला एम्माच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर असे लिहिलेले होते की, संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या मैदानामागील घराकडे या आणि आपण एकटे आहात याची खात्री करूनच या.

” ही चिट्टी वाचून मात्र टॉमला चांगलाच धक्का बसला. आपल्या मुलीला दररोज असे कोण एकट्याने बोलवत आहे हे त्याला समजू शकले नाही. यामुळे टॉमने एम्माचा पाठलाग करण्याचा विचार केला.

घरामागील जंगलात गायब झाली:-

आता टॉमने सहाव्या दिवशी पासूनच सकाळी 6.00 वाजल्यापासून त्याने आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एम्माला आपल्या घराबाहेर जाताना आणि जंगलात कुठेतरी गायब झाल्याचे त्याने पाहिले. तथापि, टॉमला नोटमध्ये नमूद केलेल्या घराबद्दल माहिती होते. म्हणूनच त्याला एम्माला शोधण्यात कोणतीही अडचण नव्हती. हे घर टॉमच्या आजोबांचे होते, जिथे जवळजवळ 50 वर्षे कोणीही राहत नव्हते.

तिथे पोचल्यावर टॉमने बाल्कनीत एम्माची वाट पाहताना एका व्यक्तीला पाहिले. एम्मा येताच तिला आत बोलावले जाते आणि दार बंद होते. टॉम घराच्या मागील दरवाजातून आत गेला. तेव्हा त्याला तेथे एका बाईचा आवाज ऐकू येतो आणि टॉम पाहतो की थोड्याच वेळात एम्मा निघून जाते. एम्मा गेल्यानंतर टॉम त्या बाईच्या रूममध्ये गेला आणि टॉमला तेथील दृश्य पाहून धक्का बसला.

खोलीत 20 हून अधिक कुत्री होती:-

टॉम जेव्हा त्या खोलीत पोहचतो तेव्हा त्याला असे आढळले की खोलीच्या आत 20 हून अधिक कुत्री हजर होती आणि एक म्हातारी महिला त्या कुत्र्यांबरोबर बसली होती. वारंवार विचारले असता, वृद्ध महिलेने रडत रडत टॉमला संपूर्ण कहाणी सांगितली. महिलेने सांगितले की ती एम्माच्या शाळेजवळील वृद्धाश्रमात राहत होती.

पण ती तिथे राहू शकली नाही, म्हणून तिने तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतला.1 वर्षांपासून ती त्याच भटक्या कुत्र्यांसह रस्त्यावर राहत होती. मग तिला एकेदिवशी एम्मा मिळाली. वृद्ध महिलेने सांगितले की एम्मानेच या घराबद्दल तिला सांगितले आणि तिला येते राहण्याची परवानगी दिली.

आपले जेवण तिला द्यायची:-

वृद्ध महिलेने टॉमला सांगितले की तिला काही काळापासून जेवणाची कमतरता आहे. एम्मा तिच्या जेवणाचा वाटा वाचवायची आणि रोज संध्याकाळी इथे आणायची. हे सर्व ऐकून टॉमच्या डोळयांत अश्रूं आले आणि त्याने घरी जाऊन आपल्या मुलीला प्रथम मिठी मारली.

यानंतर टॉमने आणि त्याच्या पत्नीने त्या वृद्ध स्त्रीला आणि सर्व कुत्र्यांना मदत करण्याचा निर्णय घेतात. त्याने त्या वृद्ध महिलेस राहण्यासाठी घर दिले. त्याच बरोबर त्यांनी तिच्या आणि सर्व कुत्र्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरवात केली. आता टॉमचे कुटुंब 40 कुत्र्यांची काळजी घेत आहे आणि हे सर्व एम्मा नावाच्या एका लहान मुलीमुळे हे सर्व शक्य झाले आहे.

Leave a Comment