११ वर्षांच्या या लहान मुलीला घेऊन घरातून पळून गेला हा मुलगा, जवळपास 1900 km दूर गेल्यावर त्यांच्यासोबत जे घडलं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागला मुलगा…’

प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण नेमकं काय असतं? फेब्रुवारी महिना येतोच तर प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साइट्स ओसंडून वाहू लागतात. अब्जावधी डॉलर्सच्या असतात या उलाढाली.

यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग खूप आधीपासून सुरू असते आणि याच चकव्याला माणूस भुलून जातो. आपल्याला ही प्रेयसी किंवा प्रियकर हवाच या भावनेने माणूस पछाडतो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच महत्त्वाचे जीवितकार्य आहे;

नव्हे याचसाठी त्याचा किंवा तिचा जन्म झाला आहे, असे वाटू लागते. मग ते प्रेम मिळविण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे प्रेम म्हणजे नेमके काय, असे विचारल्यास विविध वयोगटांतून विविध उत्तरे येण्याची शक्यता आहे.

प्रेम म्हणजे काय, असे विचारताक्षणी डोळ्यासमोर येते ती ओठांचा चंबू करून, पापण्यांची उघडमिट करीत लाडिक अविर्भाव करत, ‘ये प्यार क्या होता है?’ असे अगदी भाबडेपणाने नायकाला विचारणारी चित्रपटातील नायिका. मग झाडांच्या मागे पळत, गाणे गात चित्रपट पुढे चालू राहतो.

वर्षानुवर्षे हाच सीन सुरू आहे. आजकाल जग वाचविणाऱ्या सुपर हिरोंना एखादी खास अशी मैत्रीण असतेच. मग मुलांनी प्रेमाचा त्यांच्या दृष्टीने सहजसोपा असा अर्थ करून घेतला, तर ते साहजिकच आहे. आता अशीच एक आश्चर्यकारक आणि विचित्र घटना या प्रेमामुळे घडली आहे.

चला तर मग जाणून घेऊया की नेमके प्रकरण काय आहे. आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल की एक 14 वर्षाचा मुलगा आपल्या 11 वर्षाच्या प्रेमिकेला घेऊन तो एका कारमधून आपल्या घरातून पळून गेला. या मुलाने रात्री गुप्तपणे आपल्या वडिलांची गाडी बाहेर काढली.

आणि मग स्वत: हून गाडी चालवत तो आपल्या प्रमिकेसोबत पळून गेला. तो महामार्गावर वेगाने कार चालवित असल्याचे आढळले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील 11 वर्षाच्या गर्लफ्रेंडला पळवून घेऊन जाण्याची ही घटना आहे. पण आपल्याला या गोष्टीचे आश्यर्य वाटेल की तब्ब्ल १९०० किलोमीटरवर लांब पोचल्यावर पोलिसांनी त्या मुलाला पकडण्यात यश मिळविले.

या 14 वर्षांच्या मुलाचे नाव केविन फिगुरोस आहे. तो न्यूयॉर्कहून आयोवा राज्यात गेला होता. रविवारी त्याला आयोवा येथे पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला आता न्यूयॉर्क येथे आणण्याची तयारी सुरू आहे.

गुरुवारी कुटुंबातील सदस्यांनी मुलाच्या बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. हा मुलगा आपल्या वडिलांच्या टोयोटा कंपनीच्या एका मिनी व्हॅन सह घरातून पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की हा मुलगा तब्ब्ल 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवित असल्याचे आढळले, तर त्या रस्त्यावरील वेग मर्यादा 104 किमी प्रतितास होती. मात्र, मुलाने घरातून का पळ काढला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Comment