होणाऱ्या पतीचे हे घाणेरडे राज कळताच भडकली पत्नी, भर मंडपात बोलली, एक वेळ जीव देईल पण याच्याशी करणार नाही याच्याशी लग्न…’

उत्तर प्रदेशात या वधूने भर लग्न मंडपात हाहाकार उडवून दिला मंडपात प्रवेश करून तिने सर्वांसमोर वराबरोबर लग्न करण्यास नकार दिला आणि त्यानंतर मात्र वऱ्हाडाला खाली हात परत यावं लागलं. ही घटना उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात घडली आहे. औरैया जिल्ह्यातील जनेटपुर या गावातुन आलेल्या वऱ्हाडाचे मुलींकडून सुद्धा अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.

वऱ्हाड आल्यानंतर वरमालाचा विधीही पार पडला आणि या सोहळ्याच्या वेळी वधू सुद्धा अगदी आनंदी होती. पण काही काळानंतर मात्र या वधूने लग्न करण्यास नकार दिला आणि लाख समजावूनही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अक्षतांची वेळ जवळ आली असतानाच त्या मुलीने लग्नास नकार दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण:-

अगदी आनंदाचे वातावरण असताना अचानकच वधूने मंडपात येऊन या लग्नास नकार दिला. वधूच्या या निर्णयाने सर्वांनाच घाम फुटला होता. वधूच्या या नकारानंतर मुलांकडील लोकांमध्ये खळबळ उडाली आणि सर्वांनीच वधूला समजावण्यास सुरवात केली पण या वधूने कुणाचेही ऐकले नाही.

यामुळे लग्न मोडले:-

वर हा मुका आहे आणि हे आपल्यापासून लपवून ठेवले होते. त्याच वेळी, जेव्हा त्या मुलीला कळले की ज्याच्या सोबत आपले लग्न होत आहे तो बोलू शकत नाही तेव्हाच त्या मुलीने न घाबरता सर्वांसमोर लग्न करण्यास नकार दिला. अगदी अक्षतांच्या वेळेपर्यंत मुलीला या गोष्टीची कल्पना नव्हती.

पण अक्षतांच्या आधी त्या मुलींच्या मामाने तिला हे भयानक असे सत्य सांगितले. ज्यानंतर या मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तरीही मुलीच्या वडिलांनी तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने आपला निर्णय कायम ठेवला.

वधूला समजावण्यासाठी, तिच्या नातेवाईकांनीही तिच्यावर खूप जोर दिला, परंतु तिने सर्वांना स्पष्ट शब्दात सांगितले की मी मरेन पण त्या मुलांसोबत लग्न करणार नाही. वास्तविक, मुलीच्या कुटूंबातील काही सदस्यांना हे सत्य माहित होते.

की वर हा मुका आहे. त्याच वेळी ही गोष्ट, मुलीच्या मामाला कळली की वर हा मुका आहे. त्यामुळे त्याने कोणताही उशीर न करता याबाबत मुलीला माहिती दिली. त्यानंतर या मुलीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

एकच गोंधळ उडाला:-

वधूने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर लग्नाला आलेल्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि या ग-दारोळामुळे पोलिसांना घटनास्थळी बोलवावे लागले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला.

त्यानंतर आलेल्या वऱ्हाडास परत जाण्यास सांगण्यात आले. मात्र, कोणत्याच पक्षाने पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली नाही ही आमची परस्पर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयन्त त्यांनी केला.

Leave a Comment