हृतिक रोशन ला कि स करू इच्छिते हि सुंदर आणि हॉट अभिनेत्री, बोलली हृतिक साठी मी माझी नो किसिंग पॉलिसी देखील तोडायला आहे तैयार…’

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मन जिंकणारी सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने आता हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटविला आहे. तिचा बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली 2’ संपूर्ण देशात इतका गाजला की, कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले.

आणि तिने आपल्या अभिनयाने कोट्यावधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. आज तमन्ना भाटियाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला ती खूप आवडते . तमन्ना भाटियाने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन केले नाही.

तमन्ना भाटियाने बरेच चित्रपट केले आहेत, जेव्हा ती नवीन चित्रपटत साइन करते तेव्हा ती चित्रपटात किसिंग सीन करणार नसल्याचे स्पष्ट करते. याचा खुलासा तिने स्वत: माध्यमांसमोर केला आहे. आजच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक सिनेमात मसाला घालण्यासाठी किसिंग सीन्सकडे जास्त लक्ष देतात.

जेणेकरून अधिकाधिक लोक आकर्षित होतील, पण तमन्ना भाटियाने जेवढे पण चित्रपट केले आहे त्या चित्रपटांमध्ये तिने कोणत्याही अभिनेत्याला किस केलेले नाही.

तमन्ना भाटियाला हृतिक रोशनला किस करायचे आहे :

किसिंग सीन टाळणार्या तमन्ना भाटिया नुकत्याच एका चॅट शोच्या वेळी तिच्या मनातील इच्छा व्यक्त करताना बोलली की तिला फक्त एका अभिनेत्याला चित्रपटात किस करायचे आहे आणि तो अभिनेता अन्य कोणी नाही तर बॉलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता हृति रोशन आहे.

खरं तर तमन्ना म्हणाली की, ‘मी कधीही स्क्रीनवर किसिंग सीन करत नाही कारण तो माझ्या कराराचा भाग असतो. माझे मित्र बर्‍याचदा या बद्दल विनोद करतात आणि मी देखील त्यांना मस्करीत सांगते की हृतिक रोशनबरोबर मी किसिंग सीन करू शकतो. तमन्ना भाटियाने हे उघड केले की ती हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे.

आणि जेव्हा ती हृतिक रोशनला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती खूप उत्साही होती. तिने हृतिक रोशनला सांगितले की तो त्याची मोठी फॅन आहे, त्यानंतर हृतिकने तिला विचारले की तुला माझ्याबरोबर फोटो काढायचा आहे का? तर तमन्नाने पटकन हो म्हणत त्याच्याबरोबर एक फोटो काढला. तमन्ना म्हणाली की त्यावेळी मला अस वाटत होते की मी 16 वर्षाची मुलगी आहे.

तमन्ना भाटियाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी येथे झाला आणि तिने वयाच्या अवघ्या 13 वर्षापासून अभिनय करण्यास सुरवात केली. तमन्ना भाटिया हिने आपल्या करियरची सुरुवात 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटाद्वारे केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसे काही करू शकला नाही आणि तो फ्लॉप ठरला.

पण तिने खूप मेहनत घेतली आणि हळूहळू बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आणि आज ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतली एक नामांकित अभिनेत्री आहे. ती अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे आणि ती माधुरी दीक्षितला आदर्श मानते.

विराट कोहलीसोबतच्या संबंधाविषयी स्पष्टीकरणः

एकेकाळी तमन्ना भाटियाचे नाव भारतीय कर्णधार विराट कोहलीशीही जोडले गेले होते, परंतु तमन्नाने याबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. २०१२ मध्ये विराट आणि तमन्ना यांनी मोबाईल फोनच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले होते.

त्यानंतर अशा बातम्या आल्या की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण तमन्नाने चॅट शोमध्ये त्याबद्दल बोलताना स्पष्ट केले की अ‍ॅडच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये फक्त चार शब्दांत बोलने झाले होते .आणि त्यानंतर ते दोघेही कधी भेटले नाही आणि कधी बोलले देखील नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.