साउथ इंडियन चित्रपटांचा सुपरस्टार विजय जोसेफने नुकताच २२ जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला आहे. विजय जोसेफचे पूर्ण नाव विजय जोसेफ चंद्रशेखर असे आहे. तसे तर आपल्या फॅन्समध्ये तो फक्त विजय नावानेच ओळखला जातो. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये दिले आहेत. अशामध्ये आज आपण त्याच्या आयुष्यासंबंधी काही रंजक आणि न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.
अशी झाली सुरवात
लहानपणापासूनच विजयला अभिनयाची खूपच आवड होती. हेच कारण आहे कि त्याने बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरवात केली आणि बऱ्याच दिवसांपर्यंत त्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून अभिनय केला. मुख्य अभिनेता म्हणून पाहायला गेले तर विजय जोसेफचा पहिला चित्रपट नालया थीरपु होता. विजय जोसेफचा हा चित्रपट १९९२ मध्ये आला होता. तेव्हा विजय फक्त १८ वर्षांचा होता.
या अभिनेत्रींसोबत केले काम
यानंतर विजय जोसेफने एकापेक्षा एक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये काम केले. विजय जोसेफने आपल्या करियरमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केले आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जी आज फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे, तिने देखील आपल्या फिल्मी करियरची सुरवात विजय जोसेफसोबत एकाच चित्रपटामधून केली होती.
प्रियांका चोप्राने अभिनेता विजय जोसेफसोबत एका तमिळ चित्रपटामध्ये काम केले होते ज्याचे नाव थामिझान होते. हा चित्रपट २००२ मध्ये पाहायला मिळाला होता. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की विजय जोसेफने दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीसोबत देखील काम केले आहे.
आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर विजयने आतापर्यंत आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले आहेत.विजयवर अनेक अभिनेत्री फिदा आहेत, पण असे असून देखील विजयचे हृदय एका खूपच साधारण मुलीवर आले होते. त्याच्या पत्नीचे नाव संगीता आहे.
विजय-संगीताची लव स्टोरी
विजय आणि संगीता एकत्र एक आनंदी आयुष्य व्यतीत करत आहेत. या दोघांना दोन मुले आहेत. विजय जोसेफ आणि संगीताची लव स्टोरी खूपच रंजक आहे. मोठ्या पडद्यावर विजय जोसेफने अनेक अभिनेत्रींसोबत रोमांस केला आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये त्याने आपल्या एका फॅनशी लग्न केले.
वास्तविक संगीता युकेमध्ये राहत होती आणि विजयची ती खूप मोठी फॅन होती. सेटवर येऊन संगीताने विजयला स्वतःबद्दल सांगितले होते. यानंतर या दोघांमध्ये दीर्घ काळ बातचीत सुरु झाली. दोघांनी एकमेकांना पसंत करने सुरु केले.
नंतर एक दिवस संगीताच्या समोर विजयच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि संगीताने याचा स्वीकार केल्यानंतर २५ ऑगस्ट १९९९ मध्ये दोघांनी लग्न केले.