हात धुवून या अभिनेत्यामागे लागली होती सानिया मिर्जा, म्हणाली शोएबसोबत लग्न झाले नसते तर मी माझा सर्वस्व…’

सानिया मिर्झा ही भारताची स्टार खेळाडू आहे. तिचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप उच्च आहे. सानिया एक हुशार खेळाडू बरोबरच एक सुंदर स्त्री देखील आहे. ती तिच्या खेळासाठी आणि स्टाइलिश लुकसाठी ओळखली जाते. सानियाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबई येथे झाला होता.

ती टेनिसपटू आहे तसेच एक उत्तम जलतरणपटू देखील आहे. इतकेच नाही तर ती तेलंगणा राज्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहे. सानिया मिर्झाचे नाव भारतातील अतिशय स्टाईलिश आणि प्रसिद्ध खेळाडूंमध्ये येते.

आपल्या सर्वांना माहितच आहे की सानियाने पाकिस्ताचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. आणि त्याच्याबरोबर आनंदी जीवन जगत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का सानियाने जर शोएबसोबत लग्न केले नसते तर तिला कुनासोबत लग्न करायला आवडले असते ?

या बॉलिवूड अभिनेत्यावर क्रश होते

सानियाने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने तिच्या पहिल्या क्रशबद्दल सांगितले. तसेच तिने सांगितले की तिचे लग्न शोएबसोबत झाले नसते तर तिला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करायला आवडले असते. सानिया मिर्झाला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आवडतो.

आणि सानिया म्हणाली की तिने शोएबसोबत लग्न केले नसते तर तिला रणबीरसोबत लग्न करायला आवडले असते. सानियाने सांगितले की रणबीर बरेच दिवस तिचा क्रश होता. त्यामुळे रणबीरसोबत तिचे लग्न झाले असते.

तर तिने स्वत: ला खूप भाग्यवान समजले असते. हा होता भूतकाळ , परंतु आज ती तिचा नवरा आणि मुलगा ईजहानसोबत आनंदी आयुष्य व्यतीत करत आहे. सानिया आणि शोएबने २०१० साली लग्न केले होते.

शाहिदसोबत संबंध

पण तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता की बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सानिया मिर्झा रिलेशनशिप मध्ये होते . होय, ही त्यादिवसांची गोष्ट आहे जेव्हा शाहिद कपूरचे लग्न झाले नव्हते. निर्माता करण जोहरच्या घरी पार्टी होती या पार्टीला शाहिद कपूर आणि सानिया यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

या पार्टीतच दोघांची भेट झाली. हळू हळू दोघांमध्ये ओळख झाली आणि ते एकमेकांच्या जवळ आले. सूत्रांच्या मते शाहिद कपूरला सानिया मिर्झा आवडली होती आणि तो तिला डेटही करत होता. परंतु काही काळानंतर शाहिद आणि करीनाच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या, त्यानंतर सानिया आणि शाहिदचे ब्रेकअप झाले.

सानियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच शाहिद आणि करिना रिलेशनशिपमध्ये आले. मात्र करीनासोबत देखील शहीदचे संबंध यशस्वी झाले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. बर्याच अडथळ्यांनंतर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. आज मीरा आणि शाहिद सुखी आयुष्य जगत आहेत.

शाहिदचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरविषयी जवळपास सर्वांनाच माहिती असेल. पण सानिया मिर्झा आणि त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सानिया शाहिदसोबत कधीच बोलली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.