एक काळ असा होता की झीनत अमान संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य करत होती. ते सत्तरचे दशक होते, जेव्हा झीनत अमान एक मोहक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. झीनत अमानची तेव्हा ओळख एक बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणूनच झाली होती.
अनेक प्रेक्षक तिच्या सौदर्याने घायाळ झाली होती. झीनत अमानने जा चित्रपटांमधून नाव व लोकप्रियता मिळवली त्यामध्ये मुख्यता डॉन, लावारिस, पुकार, यादों की बरात, दोस्ताना, सत्यम शिवम सुंदरम, कुरबानी, हरे रामा हरे कृष्णा, महान आणि द ग्रेट गैंबलर यांचा समावेश होता.
त्याकाळी झीनत अमानचे जवळपास सर्वच चित्रपट हिट असायचे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जवळपास तिचाच बोलबाला होता. नुकताच 19 नोव्हेंबरला झीनत अमानने आपला 69 वा वाढदिवस साजरा केला आहे.
झीनत अमान इतकी सुंदर होती की बरेच लोक तिच्या प्रेमात पार वेडे झाले होते. तिच्या सौंदर्यावर मरणाऱ्या लोकांची अजिबात कमतरता नव्हती. झीनत अमान त्या काळात तिच्या चित्रपटांना घेऊन जितकी चर्चेत असायची, तितकीच चर्चा तिच्या प्रेम संबंधाच्या असायच्या.
झीनत अमानच्या प्रेमात पडलेल्या लोकांची संख्या कित्येक होती, परंतु तिच्यावर खरे प्रेम करणार्यांची संख्या खूपच कमी होती. झीनत अमानच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वाद जोडले गेले आहेत. तिच्या प्रेम संबंधामुळे ती नेहमीच मीडियामध्ये चर्चेचा विषय असायची. देव आनंदपासून ते अगदी पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानशी तिचे संबंध होते अशा अनेक बातम्या तेव्हा मीडियामध्ये येत होत्या.
विशेषत: इम्रान खानशी:-
इम्रान खानवर असलेल्या तिचा प्रेमाची सैदव चर्चा असायची. त्याकाळी इम्रान खान हा पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्वात देखणा चेहरा होता आणि झीनतवर तो पूर्णपणे तो फिदा झाला होता.
झीनतलाही त्याच्या खेळाने भुरळ पाडली होती. ते दोघेही लंडनमध्ये बऱ्याच वेळा भेटताना मीडियाला दिसले आहेत शिवाय इम्रान सुद्धा झीनतच्या प्रेमाखातीर त्याने बर्याच वेळा भारतला भेट दिली होती.
पण तीन विवाहानंतरही सिंगल असलेली झीनत अमान दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आली होती, जेव्हा तिने व्यावसायिक अमन खन्ना उर्फ सरफ्रजवर शोषण व फसवणूकीचा आरोप केला होता. यानंतर सरफराजलाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
कोर्टात सत्य आले बाहेर:-
तथापि, कोर्टामध्ये हे सत्य उघड झाले आणि हे जाणून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. यावेळी दोघांनी सुद्धा लग्न केले असल्याचे समोर आले. झीनतशी लग्न करण्यासाठी सरफराजने आपला धर्मही बदलला होता आणि त्यामुळेच तो अमन खन्नापासून सरफराज हसन झाला होता.
मौलवीनेही कोर्टात सर्व सत्य सांगितले होते आणि सांगितले होते की ५९ वर्षांची वधू आणि 33 वर्षांचा वर यांच्यात झालेला हा विवाह तो कसा विसरू शकतो. दोन मुलांचा बाप असलेला अमन खन्ना झीनतला एका पार्टीत भेटला होता आणि तेव्हाच तो झीनत अमानच्या प्रेमात पडला होता त्यासाठी त्याने आपला धर्म बदलला आणि झीनतशी लग्न केले.