स्वतःपेक्षा 18 वर्षाने मोठ्या या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी झाली होती माधुरी दिक्षीत, म्हणाली तो दररोज स्वप्नात येऊन माझ्यासोबत…’

जेव्हा संपूर्ण चाहत्यांचे हृदय माधुरी दीक्षितसाठी धडधडत होते तेव्हा माधुरी या व्यक्तीच्या प्रेमात झाली होती पागल. भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी नुकताच आपला 71 वा वाढदिवस साजरा केला आहे.

10 जुलै 1949 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या सुनील यांनी भारतीय क्रिकेट संघात अनेक प्रभावी विक्रम नोंदवले. तसेच त्यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 51 च्या सरासरीने 114 डावांत फलंदाजी केली. सुनिल गावस्कर हे 108 एकदिवसीय सामने खेळले आहे.

त्यांनी 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3092 धावा केल्या आहेत. गावस्कर एक चांगले फलंदाज होते पण क्रिकेटशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कथाही रंजक होत्या. अशीच एक कहाणी आहे जेव्हा माधुरी दीक्षित सुनील गावस्कर यांच्या प्रेमात पडली होती. याचा खुलासा स्वतः माधुरीने एका मुलाखतीत केला आहे.

माधुरी सुनिल गावस्करचे स्वप्नं पाहत असत

माधुरी दीक्षित जेव्हा मोठ्या पडद्याची सुपरस्टार बनली होती तेव्हा तिचे चाहते रात्रंदिवस तिचे स्वप्न पाहत असत. तेव्हा माधुरी प्रत्येकाच्या हृदयात राहत होती, पण त्या दिवसांमध्ये माधुरीच्या हृदयात एक दुसररिच व्यक्ती होती. ती म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर.

माधुरीने एका मुलाखतीत आपली इच्छा प्रकट केली होती. माधुरी म्हणाली होती- मी गावस्करांची स्वप्नं पाहत असे. त्या काळात माधुरी अवघ्या 25 वर्षांची होती आणि सुनील गावस्कर तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठे होते. माधुरीला ते खुप आवडत होते.

सुनील गावस्कर यांची भारतीय क्रिकेटमध्ये चांगली प्रतिष्ठा होती. माधुरी स्वत: देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चाहती होती. माधुरी बोलली ते माझ्या स्वप्नात येऊन माझ्यासोबत बोलायचे. ज्या वेळी माधुरी सुनिल गावसकर यांचे स्वप्न पाहत होती तेव्हा गावस्कर यांचे लग्न झालेले होते. ते क्रिकेटविश्वातून निवृत्त झाले होते. गावस्कर यांनी स्वतःच्याच एका फॅनला डेट केल्यानंतर लग्न केले होते .

दोन वर्षांपूर्वी झाली होती पहिली भेट

2018 च्या आयपीएल दरम्यान माधुरी आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. माधुरीने सुनील गावस्कर यांच्या सोबतचा एक फोटो तिच्या अधिकृत अकाऊंट वर शेअर केला होता. हा फोटो माधुरीच्या 51 व्या वाढदिवशी आयपीएलच्या प्री मॅच शोच्या अतिरिक्त खेळी दरम्यान घेण्यात आला होता. चाहत्यांना हा फोटो फार आवडला होता .

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की क्रिकेट आणि बॉलिवूडमधील नाती नेहमी सारखीच राहिली आहेत. बॉलिवूड मधील अभिनेत्रिंना पूर्वीच्या काळापासून भारतीय क्रिकेटर आवडतात तर स्टार क्रिकेटरसुद्धा या आभिनेत्रींच्या प्रेमात क्लिन बोल्ड झाले आहेत. यामध्ये पटौदी- शर्मिला ते अनुष्का-विराट अशी अनेक नावे आहेत.

बॉलिवूडचे क्रिकेटसोबत जुने सं बंध

बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्समध्येही अशी अनेक जोडपी होती जी बरीच चर्चेत आली होती पण त्यांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचले नाहीत. सुनील गावस्करवर क्रश असलेल्या माधुरीला अजय जडेजा खुप आवडत होता. त्या काळात दोघांच्या अफेअरच्या कहाण्या बर्‍याच चर्चेत आल्या होत्या.

असेही वृत्त आहे की, माधुरीच्या सांगण्यावरून निर्माते अजयला चित्रपटांमध्ये घेऊन जाण्याचा विचार करत होते. मात्र, अजयने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे मानले आणि चित्रपटांचा विचार करने सोडले. त्याचवेळी फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे माधुरीने अजयपासून अंतर ठेवले.

याशिवाय माधुरीचे नाव संजय दत्त आणि अनिल कपूर यांच्याशीही जोडले गेले होते, परंतु कोणतेही नाते फार काळ टिकले नाही. यानंतर, माधुरीचे 1999 मध्ये डॉ. श्री राम नेनेसोबत लग्न झाले आणि आता ती आपल्या मुलांसह आणि पतीसमवेत उत्तम जीवन जगत आहे.

Leave a Comment