स्वतःच्याच सुनेला मुलगा होऊन देत नाही हा सासरा, कारण हि आहे तितकंच खतरनाक..’ पहा

कोणतेही आजी-आजोबा नातवंडांना आपल्या मांडीवर खेळवण्याचे स्वप्न पाहत असतात, पण भोपाळमध्ये असे एक आजोबा आहेत ज्यांनी आपल्या मुलांवर त्याला मुलं न होण्यासाठी दबाव आणला आहे. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलावर अशा प्रकारे दबाव आणला आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की जर तुला बाळ झाले तर तुला माझा मालमत्तेतून हाकलून देण्यात येईल, त्या मुलांच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याला अजून पर्यत आपल्या मुलाचा चेहरा बघायला मिळाला नव्हता शेवटी कंटाळलेली आणि दु: खी सून कुटुंब न्यायालयत पोहोचली आहे.

तिने आपल्या सासर्‍याला समजावून सांगण्याची विनंती केली आहे. मात्र, सहा समुपदेशनानंतरही तिच्या सासऱ्यांमध्ये काही बदल झाला नाही. आता पुढच्या समुपदेशनासाठी त्या सासऱ्याला बोलवण्यात आले आहे. निवृत्त भोपाळ मधील एका अधिकाऱ्याच्या कुटूंबातील ही विचित्र बाब आहे.

लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात, सुनेने तिच्या सासऱ्याला आणि आपल्या पतीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण मिटलेले नाही. समाज आणि कुटूंबाच्या छळामुळे त्रस्त झालेल्या या मुलीने अखेर सप्टेंबर 2020 मध्ये कुटुंब कोर्टात अर्ज केला. तीन महिना सुरू असलेल्या सुनावणीनंतरही यावर तोडगा निघालेला नाही.

समुपदेशक असणाऱ्या रजनी यांनी त्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला स्वतंत्र घर घेण्याचा सल्ला दिला आहे, पण त्या मुलाला आपल्या वडिलांना सोडायचे नाही आणि त्याचे वडील सुद्धा ही बाब मान्यास तयार नाहीत.

सासरे म्हणाले की जर यांना मुलं झाले तर मला वृद्धाश्रमात पाठवतील:-

जेव्हा कोर्टातील सल्लागाराने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला म्हणजेच त्या सासऱ्याला बोलविले तेव्हा त्यांनी असा युक्तिवाद केला की जर मुलगा आणि माझा सुनेला मुलगा असेल तर ते माझी काळजी घेणार नाहीत. मला वृद्धाश्रमात पाठवतील.

माझा मुलगा व सुनेची पहिले कर्तव्य म्हणजे माझी सेवा करणे. मी मेल्यावर हे लोक त्याचे मुले जन्मास आणू शकतात आणि जर माझा सुनेला मूल हवे असेल तर ती माझ्या मुलाला घटस्फोट देऊन पुन्हा लग्न करू शकते.

पतीही साथ देत नाही:-

पहिल्या समुपदेशनात पतीने सांगितले की वडिलांना मुल नको आहे आणि जर आम्ही हे केले तर ते त्यांच्या मालमत्तेतून आम्हाला काढून टाकतील. नवरा एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. त्या मुलीने वचन दिले की मूल झाल्यावरही सासऱ्याची सेवा करेन:-

समुपदेशन दरम्यान, त्या मुलीने वचन दिले की मुल झाल्यावरही ती आपल्या सासऱ्याची सेवा करेल, आणि असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला देण्यास आता ती तयार आहे.

Leave a Comment