सौंदर्याच्या बाबतीत दिशा पटानीला मागे टाकते तिची बहिण खुशबू पटानी, फोटो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने आपल्या हॉट फिगर, बोल्ड स्टाईल, स्मित हास्य आणि मोहक अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. एम एस धोनी मधुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दिशाने एकापाठोपाठ अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि आज ती लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

दिशाचा जन्म बरेली शहरात झाला होता आणि तिथूनच तिने तिचे शालेय शिक्षण घेतले आहे. दिशा पटाणीच्या कुटूंबाबद्दल बोलायचे झाले तर तिच्या कुटुंबात 5 लोक आहेत, दिशाचे वडील जगदीश पटानी यूपी पोलिसात डीएसपी च्या पदावर आहेत, तिची आई गृहिणी आहे, दिशाची मोठी बहीण खुशबू पटानी सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत आहे. आणि धाकटा भाऊ सूर्यांश पटानी.

दिशा पटाणी परिवार

दिशाचे सौंदर्य जसे वेड लावनारे आहे तसेच तिची बहीण खुशबू पटानीला पाहिल्यानंतर तुम्ही तिचेही फॅन व्हाल, दिशाच्या बहिनीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले तरी सौंदर्याच्या बाबतीत ती दिशा पटानीपेक्षा कमी नाही. आणि खुशबू पटानीचे हे छायाचित्रं याचा पुरावा देतात. खुशबू पटानीचे ही छायाचित्रे बघा-

दिशा पटानीचा चित्रपट प्रवास

दिशा पटानी (खुशबू पटानीची बहिण) पेशाने एक मॉडेल आहे, जेव्हा ती लखनौच्या अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये शिकत होती, तेव्हा तिला पहिल्या वर्षापासूनच मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली.

त्यानंतर दुसर्‍या वर्षी दिशा पटानीने आपले शिक्षण मधल्या काळात सोडले आणि 2013 फेमिना मिस इंडिया इंदूरमध्ये सहाभागी होन्यासाठी गेली, दिशा पटानी या शोमध्ये उपविजेते ठरली होती. दिशा पटानीने ‘हिरोपंती’ या चित्रपटासाठी देखील ऑडिशन दिले होते, ज्यात तिला नाकारले गेले होते.

यानंतर, दिशा पटानी अनेक व्यावसायिक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली, ज्यामध्ये ती कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीमध्ये दिसली आणि ती ‘लोफर’ या तेलगू चित्रपटामध्येही दिसली होती. दिशा पटानीने टायगर श्रॉफबरोबर ‘बेफिक्रा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते.

त्यानंतर ती 2016 मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘बागी -२’ या चित्रपटांतही दिसली. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिचे खूप कौतुक झाले होते. दिशा 2017 मध्ये इंडो चायनीज फिल्म कुंग फुंग योगामध्ये दिसली होती. सध्या दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात दिसणार आहे.

खुशबू पटानी इंस्टाग्राम

खुशबू पटानीची छायाचित्रे पाहून तुम्हाला ती किती सुंदर आहे हे समजले असेलच. खुशबू पटानी यांचे इन्स्टाग्राममध्ये मोठ्या संख्येने फोलोअर्स आहेत.

Leave a Comment