सैफ अली खान नव्हे तर हा विवाहित अभिनेता होता करीना ची पहिली पसंत, बरेच वर्ष डेट केले परंतु…’

करीना कपूर आणि सैफ अली खान ही बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी मानली जाते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि नंतर दोघांनीही लग्न केले. करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या वयात खूप फरक होता आणि ती सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

इतकेच नाही तर करीना सैफ अली खानची दुसरी पत्नीही आहे. मात्र, सैफशी लग्न करण्यापूर्वी करीनाने एका विवाहित नायकास डेट केले होते. एकदा करीना कपूरला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा ती म्हणाली की मी विवाहित पुरुषासोबत अफेयर करनार नाही. पण करीनाने हृतिक रोशनला डेट केले होते जो विवाहित होता.

असे म्हटले जाते की करीना आणि हृतिकमधील अफेयर 2004 मध्ये ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटा दरम्यान सुरू झाले होते. पण हृतिक विवाहित होता. म्हणुन तिने माघार घेतली. त्यानंतर करीनाने शाहिद कपूरला डेट करण्यास सुरवात केली. पण हे संबंधही फार काळ टिकले नाहीत.

शाहिदपासून विभक्त झाल्यानंतर करिना कपुर घटस्फो टित सैफ अली खानच्या प्रेमात पडली. सैफ अली खानने करीना कपूरच्या आधी अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता सिंग 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते.

अमृता सिंग खूपच सुंदर होती आणि तिला पाहूनच सैफ अली खान तिच्या प्रेमात पडला होता. अमृता सिंग सैफ अली खानपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. वयातील अशा फरकामुळे सैफ अली खानचे कुटुंब त्यांच्या नात्यावर खुश नव्हते.

असे म्हटले जाते की सैफ अली खानने आपल्या कुटूंबाच्या विरोधात जाऊन अमृता सिंगशी लग्न केले आणि जेव्हा सैफ अली खानने लग्न केले तेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता. या लग्नातून सैफ अली खानला दोन मुलं झाली. सारा अली खान (मुलगी) आणि इब्राहिम अली खान (मुलगा) अशी त्यांची नावे आहेत.

2004 मध्ये घटस्फो ट घेतला

1991 साली अमृता सिंग आणि सैफ यांचे लग्न झाले होते आणि 2004 मध्ये ते वेगळे झाले. यानंतर सैफ अली खानने बर्‍याच मुलींना डेट केले. या दरम्यान करीना शाहिद कपूरला डेट करत होती. शहीद आणि करीनाची जोडी चांगलीच पसंत केली जात होती. पण काही वर्षानंतर हे दोघेही वेगळे झाले.

दरम्यान, करीना कपूरने सैफ अली खानची भेट घेतली आणि करीनाने सैफ अली खानला बरीच वर्षे डेट केले. 2014 मध्ये या दोघांचे लग्न झाले. त्यांचे लग्नही चर्चेचा विषय बनला होता. कारण दोघांनी कोर्टात लग्न केले होते.

त्याचबरोबर या लग्नापासून त्यांना तैमूर खान नावाचा एक मुलगा आहे. तैमूरचा जन्म वर्ष 2016 मध्ये झाला होता. आज सैफ आणि करीनाच्या लग्नाला 6 वर्ष झाले आहेत आणि ते दोघेही खूप आनंदी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.