सुमारे 11 वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेली हि मुलगी 11 वर्षानंतर सापडली शेजारच्यांच्याच घरात, कारण समजल्यावर मोठ्याने रडायला लागले आईवडील..’

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रेमी जोडे बघतो.काही जात- पात, धर्म- पंथ या पलीकडे जाऊन प्रेम करतात, त्यातले काही यशस्वी होतात, आणि काही आठवणी देऊन जातात. प्रत्येक जोड्याची वेगळी प्रेम कहाणी आपल्या बघायला मिळते.अशीच एक अस्सल जीवनातील अनोखी प्रेम कहाणी मी आपल्याला सांगू इच्छितो.

जी ऐकून कदाचित आपल्याला धक्का बसेल,पण हे तितकेक सत्य आहे. हे प्रकरण आहे तिरुअनंतपुरम येथील ,केरळमध्ये एक विचित्र प्रकार समोर आले आहे. येथे एक 18 वर्षीय मुलगी 11 वर्षांपासून बेपत्ता होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी तिच्या आई -वडिलांच्या घरापासून फक्त 500 मीटर अंतरावर सापडली.

प्रकरण पलक्कडच्या अयालूर गावाचे आहे. मुलगी सुमारे 11 वर्षांपासून तिच्या प्रियकराच्या घरी एका छोट्या खोलीत राहत होती. तिच्या आई -वडिलांचे घर फक्त 500 मीटर अंतरावर होते, पण त्यांना याबद्दल भनक सुध्दा नव्हती. वर्ष 2010 मध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी सजिता हरवल्याचा अहवाल दाखल केला.

मीडिया रिपोर्टनुसार, सजीता रेहमान नावाच्या मुलाच्या प्रेमात होती. रहमानसोबत राहण्यासाठी तिने घर सोडले. विशेष म्हणजे रहमानचे आई -वडील, बहीण आणि पुतण्यासह घरात आणखी चार लोक होते, पण त्यांना घरात सजिताच्या उपस्थितीची माहिती नव्हती. रहमानने कुटुंबीयांना स्पष्टपणे सांगितले होते की त्याच्या खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही.

सजीता देखील 10 वर्षांपासून एकाच खोलीत राहत होती. ती रात्री बाहेर जाऊन आंघोळ करायची. ती काही काळ घराबाहेर बसायची. रहमान घरातूनच दुपारचे जेवण पॅक करून घ्यायचा. मग तो गुपचूप सजिताला द्यायचा. मार्चमध्ये रहमान काही दिवसांसाठी बेपत्ता झाला होता. मग परत आला. रहमानने उघड केले की तो जवळच्याच गावात भाड्याच्या घरात सजितासोबत राहत होता.

11 वर्षापूर्वी साजिताच्या बेपत्ता होण्याविषयी विचारल्यावर या जोडप्याने संपूर्ण कथा उघड केली. तत्यांनी सांगितले की सजिता 11 वर्षांपासून घरात कशी आहे आणि कोणालाही याची खबर कशी झाली नाही. रात्रीच्या वेळी, जेव्हा सगळे झोपले असत, तेव्हा सजिता खोलीच्या खिडकीतून बाहेर यायची.

त्यासाठी खिडकीतून ग्रील काढले होते. नेनमारा पोलीस ठाण्याच्या दीपा कुमार यांनी खुलासा केला आहे ,की या जोडप्याने त्यांचे नाते गुप्त ठेवले कारण त्यांना कुटुंबाची भीती वाटत होती. शेवटी, दोघेही स्थानिक न्यायालयात गेले आणि तेथे एकत्र राहण्याची परवानगी मिळवली. आता दोघेही त्यांच्या भाड्याच्या घरात राहतात.

Leave a Comment