टेनिसद्वारे जगभरात आपले आणि आपल्या देशाचे नाव रोशन करणारी सानिया मिर्झा ही सर्वांचीच आवडती खेळाडू आहे. जरी अनेक सामान्य लोक सानियावर प्रेम करत असले तरी बॉलिवूडमधील अनेक कलाकारही तिच्या प्रेमात पडले आहेत.
आपल्याला माहित आहे की सानिया एक स्मार्ट खेळाडू आहे आणि ती दिसायला सुद्धा खूपच मनमोहक आहे आणि म्हणूनच कोणीही सहज तिच्या प्रेमात पडू शकते. पण सानिया आता पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी आहे, पण एक काळ असा होता.
की अभिनेता शाहिद कपूरसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाबद्दल बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली होती. असं म्हणतात की या दोघांमधील नातं खूपच घट्ट आणि मजबूत होते, परंतु सानिया आणि शाहिद यांनी कधीही याबद्दल उघडपणे बोलले नाही.
शाहिदला मारायला जात होती:-
एका शो दरम्यान सानियाला जेव्हा हिंदी चित्रपटातील कोणता नायक तुम्हाला प्रपोज करत नाही असे विचारले गेले, तर मग हे कसे झाले? यावर सानियाने उत्तर दिले की, “माझ्यासोबत असे कधीच झाले नव्हते आणि कोणत्याही हिरोने आजपर्यंत मला प्रपोज केले नाही.”
यानंतर जेव्हा जेव्हा तिला याबद्दल विचारले गेले की तुझ्याबद्दल आणि शाहिदबद्दल खूप चर्चा आहे? हे खरं होतं का? या प्रश्नाला सानियाने लगेच उत्तर दिले की मला काही आठवत नाही पण हे खूप पूर्वी घडले आहे. मी खूप प्रवास करत असते म्हणूनच ते शेवट पर्यंत टिकू शकले नाही, असे तिने मजेमध्ये म्हणले.
मग तिला विचारण्यात आले की तुला काय करायचे आहे, जर तुला लग्न करायचं असेल, हुक शॉट, आणि कोणाला मारायचे असेल तर, रणबीर, रणवीर ,शाहिद यामध्ये कोणासोबत काय करणार ? सानिया हसली आणि म्हणाली, मला रणवीरबरोबर हुक करायचे आहे, रणबीरशी लग्न आणि शाहिदला मला मारायचे आहे.
शाहिदसोबत भेट: –
शाहिद आणि सानिया एका मित्रांच्या माध्यमातून भेटले, जेव्हा करीना शाहिदच्या आयुष्यातून बाहेर गेली तेव्हा सानिया शाहिदच्या जखमांवर उपचार करणारी ठरली. यापूर्वी २००९ मध्ये हे दोघे एकमेकांसोबत दिसत होते. यावेळी दोघांनीही हे नातं लपवण्याचा नेहमीच प्रयत्न केला होता.
तेव्हा सानिया अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर दिसली होती आणि तिच्या दिग्दर्शनात शाहिदचे एका चित्रपटातील दृष्य सुद्धा निश्चित झाले होते. अनेक वेळा दोघांनाही बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये स्पॉट केले गेले होते.
तर शाहिद आणि सानियाला एका हॉटेलच्या वेटरने एका खोलीत त्या अवस्थेत पकडले होते, त्यानंतर त्यांचे संबंध संपूर्ण मिडियामध्ये उघड झाले होते, परंतु त्यांचे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत.
6 महिन्यांत ब्रेकअप झाला: –
शाहिद इंडस्ट्रीतील काही बड्या अभिनेत्रींसोबत फिरताना दिसला असा आरोप करण्यात आला. अशीही बातमी आहे की सानिया शाहिदला डेट करताना ती एका तेलगू स्टारला सुद्धा डेट करत होती, ज्यामुळे त्याच्यात अंतर वाढले होते. त्यानंतर ते मग कायमचे वेगळे झाले. नंतर सानियाने शोएबशी लग्न करून नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि शाहिदने मीरा कपूरसोबत लग्न केले.