आपण सर्वजण तर नागार्जुनला चांगलेच ओळखतो. नागार्जुनचे पूर्ण नाव अक्किनेनी नागार्जुन असे आहे. नागार्जुन एक भारतीय चित्रपट निर्माता आणि एक अभिनेता देखील आहे. त्याचा जन्म २९ ऑगस्ट १९५९ रोजी मद्रास मध्ये झाला होता.
नागार्जुन साउथमध्ये स्वतः एक ब्रॅंड आहे आणि त्याला लाखो लोक पसंत करतात. त्याचे फॅन्स देखील जगभरामध्ये पसरले आहेत. पूर्ण भारतामध्ये रजनीकांतसारखे नागार्जुनचे चाहते देखील त्याचे चित्रपट पाहण्यासाठी काहीही करायला तयार राहतात. नागार्जुनने अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ज्या चित्रपटांमध्ये तो मुख्य ‘शिवा’ आणि ‘विक्की दादा’ आहे. या चित्रपटांनी तर साउथमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सगळीकडे सर्वांच्या तोंडामध्ये एकच नाव येत होते आणि ते म्हणजे नागार्जुन, आणि या दोन्ही प्रभावी चित्रपटांमुळे त्याचे नाव खूपच फेमस झाले.
नागार्जुनचा मुलगा अक्किनेनी नागा चैतन्यसुद्धा एक महान अभिनेता आहे. चैतन्यसुद्धा आपल्या वडिलांसारखा हँडसम आणि स्मार्ट आहे आणि त्याची पत्नी सुद्धा खूपच सुंदर आणि बो-ल्ड आहे. चैतन्यच्या पत्नीचे नाव समांथा रुथ प्रभू असे आहे जी एक साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आज आम्ही या लेखामधून समांथा रुथ प्रभूविषयी माहिती देणार आहोत. जी दिसायला खूपच सुंदर आणि बो-ल्ड आहे. समांथा रुथ प्रभू तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. समांथाचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी चेन्नई तामिळनाडू येथे झाला होता.
समांथा रुथ प्रभूने आपले प्राथमिक शिक्षण होली एंजेलस एंग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल चेन्नई येथून पूर्ण केले होते. यानंतर समांथाने स्टेल्ला मारिस कॉलेज चेन्नई येथून कॉमर्सची पदवी संपादन केली. जर तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर ती कॉलेजमध्ये तिच्या काळातील सर्वात इंटेलिजेंट मुलींपैकी एक होती.
आणि तिच्यामध्ये तेव्हापासूनच एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनण्याची इच्छाशक्ती होती.तिने आपल्या फिल्मी करियरची सुरवात तेलुगु चित्रपट ये माया चेसवा मधून सुरवात केली होती. त्यानतंर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपला अभिनय सादर केला.
ज्यासाठी समांथाला सर्वश्रेष्ठ नवोदित अभिनेत्रीचा फिल्म फेयर पुरस्कार-दक्षिण मिळाला. समांथा रुथ प्रभूने तेलुगु चित्रपटांमध्ये अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत ज्यासाठी समांथा रुथ प्रभूला सर्वश्रेष्ठ तेलुगू अभिनेत्री फिल्मफेयर पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ तमिळ अभिनेत्री फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार मिळवणारी ती दुसरी अभिनेत्री बनली होती. समांथाच्या वडिलांचे नाव जोसेफ प्रभू आणि आणि तिच्या आईचे नाव निनेत्ते आहे. समांथाला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव जोनाथन प्रभु आहे. समांथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्न केले होते.
त्यांच्या लग्नाला अजून जास्त काळ झालेला नाही आणि त्याचे आयुष्य खूपच आनंदाने व्यतीत होत आहे आणि ते आपल्या वैवाहिक आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आहेत. समांथा एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती अनेक ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी एंडोसर सुद्धा आहे.
समांथा सोशल मिडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करते आणि ती जितकी सोशल मिडियावर ऍक्टिव्ह असते तितकेच तिचे फॉलोवर्स देखील अक्टिव्ह राहतात. तिचे फॉलोवर्स तिच्या फोटोंची नेहमी वाट पाहत असतात आणि तिच्या फोटोंना लाईक करतात.