जुन्या काळातील टीव्ही मालिकांविषयी जर आपण चर्चा केली तर त्यात तुमची आवडती मालिका शक्तिमान नक्कीच असणार. होय, नव्वदच्या दशकात शक्तीमान सीरियल ही खूपच फेमस होती. तसे, ही मालिका इतकी प्रसिद्ध होती की ती केवळ मुलेच नव्हे तर ज्येष्ठ व्यक्ती देखील मोठ्या उत्साहाने ही मालिका पाहत होते.
ही सीरियल २००५ मध्ये संपली असली तरी लोकांच्या मनात त्या सीरियल विषयीं अनेक आठवणी आहेत. तसे, आपल्याला लक्षात येईल की शक्तीमान व्यतिरिक्त एक मुलगी देखील होती, जी शक्तिमान आवडत असायची. होय, आपण त्याच मुलगी बद्दल बोलत आहोत जिच्या मागे शक्तिमान हात धुवून लागला होता.
खरं तर या मालिकेत तिचे नाव गीता विश्वास होते आणि इतक्या वर्षानंतर आज ती खूप बदलली आहे. तसे, तिचे खरे नाव वैष्णवी महंत आहे. शक्तीमान मध्ये गंगाधर आणि गीता यांच्यातील प्रेमकथाही प्रेक्षकांना खूप आवडली.
वैष्णवीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांद्वारे केली असली तरी तिला खरी ओळख या मालिकेमधून मिळाली. सर्वप्रथम, ती शक्तीमान या मालिकांद्वारे घरा घरात प्रसिद्ध झाली. बरहलाल सीरियल बंद झाल्यानंतर गीता म्हणजेच वैष्णवीच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे.
शक्तीमान सीरियल बंद झाल्यानंतर सुद्धा वैष्णवीने मालिकेत काम करणे थांबवले नाही, ती अजूनही छोट्या पडद्यावर काम करत आहे. पण हे लक्षात पाहिजे की, नेहमी साध्या लुकमध्ये राहणाऱ्या वैष्णवीने जेव्हा बोल्ड फोटोशूट केले तेव्हा वैष्णवी खूपच चर्चेत आली.
ज्यामुळे तिचे चाहतेही खूप आश्चर्यचकित झाले. तथापि, मालिकांमध्ये काम केल्यानंतर वैष्णवीने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. वैष्णवीने अनेक टॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
याशिवाय गेल्या वर्षी ती प्रसिद्ध मालिका सपने सुहाने लड़कपन के यामध्ये मुख्य भूमिकेतही दिसली आहे. यासह ती एक प्रसिद्ध मालिका ‘जब हम तुम’ याचा सुद्धा हिस्सा राहिलेली आहे.