विवाहित सुनील शेट्टीच्या प्रेमात स्वतःच भान विसरून गेली होती हि सुप्रसिद्ध अभिनेत्री, बोलली लग्न करेल तर फक्त त्याच्याशीच…’

बॉलिवूड इंडस्ट्रीत 90च्या दशकातील अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सध्या तो चित्रपटांमध्ये खुप कमी वेळा दिसतो, तरी एक काळ असा होता की सुनील शेट्टी मोठ्या पडद्यावर त्याच्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असत.

90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टार सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केले. अक्षय कुमारच्या एंट्रीपूर्वी सुनीलला बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार म्हटले जात असे. असं म्हणतात की सुनीलची फिटनेस पाहून इतर बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या फिटनेसची काळजी घ्यायला सुरुवात केली होती.

त्याच वेळी, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर लाखो मुली फिदा झाल्या होत्या. त्याच्या मोहक आणि तंदुरुस्त लुकमुळे बॉलिवूड अभिनेत्री देखील खूप प्रभावित होत असे. त्यापैकी एक होती सोनाली बेंद्रे.

सोनाली बेंद्रे सुनील शेट्टीवर खूप प्रेम करत होती…

सुनीलच्या प्रेमाने अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हृदयावर जादू केल्यासारखे काम केले होते, सोनालीने मनापासून सुनीलवर प्रेम करण्यास सुरवात केली होती. हा तो काळ होता जेव्हा सुनील इंडस्ट्रीमधील टॉप स्टार्सपैकी एक होता. एकेक करून त्याचे सर्व चित्रपट सतत हिट होत गेले.

या काळात सुनील आणि सोनालीच्या जोडीला रुपेरी पडद्यावर खुप पसंत केले जात असे. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. उदाहरणार्थ, भाई, रक्षक, टक्कर, सबुत, गद्दार, हमसे बढकर कौन आणि कहर यांसारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये या दोघांनी खुप चांगले काम केले होते.

एवढ्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असतांना हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले होते, नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. सुनील आणि सोनालीच्या प्रेमसंबंधाच्या बातम्यांना खूप हवा मिळाली पण दोघांनी कधीही त्यांच्या प्रेमसंबंधाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

ते दोघेही एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगत राहिले. सुनीलशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या ऐकल्यानंतर सोनालीला राग येत असे. तिचा असा विश्वास होता की अफेअरच्या बातमीमुळे त्यांच्या मैत्रीवर परिणाम होत आहे.

सोनालीला सुनीलशी लग्न करायचं होतं…

असे असूनही, या दोघांच्या अफेअरची नेहमीच माध्यमात चर्चा होत असे. मीडिया रिपोर्टनुसार सोनाली सुनीलच्या प्रेमात कधी पडली हे तिला देखील माहित नव्हते. असं म्हणतात की, सोनाली बेंद्राणला सुनील शेट्टीसोबत लग्नही करायचं होतं.

मात्र सुनील शेट्टी विवाहित असल्याने सोनालीचे प्रेम एकतर्फी होते. सुनीलने 1991 मध्ये मोनिषा कादरीशी लग्न केले होते. मोनिषा मुस्लिम होती, पण सुनील सोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. सुनील त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता, म्हणूनच सोनालीला माघारी घ्यावी लागली.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार गोविंदानेसुद्धा एकदा आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की सुनील शेट्टीचे लग्न झाले नसते तर त्याने सोनालीशी लग्न करण्याचा विचार केला असता. मात्र, आज सुनील आणि सोनाली दोघेही आपल्या कुटूंबा समवेत खुप खुश आहेत.

Leave a Comment