विदेशात रिपोर्टर ची नोकरी करत होती हि सुंदर आणि हॉ ट मुलगी, संधी मिळताच बनली बॉलीवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री….पहा फोटो’

श्रीलंकेतील जॅकलिन फर्नांडिसचा जन्म 1985 मध्ये मनामा बहरीन येथे झाला होता. तिचे वडील श्रीलंकंन तामिळ तर आई मलेशियन आहे. खुपच कमी चित्रपटांमध्ये काम करून जॅकलिन बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री बनली आहे. जॅकलिन शेवटच्या वेळी ड्राईव्ह या चित्रपटात दिसली होती, ज्यात तिचा नायक सुशांत सिंग राजपूत होता.

चित्रपटांव्यतिरिक्त जॅकलिन तिच्या अफ़ेअर्समुळे खुप चर्चेत होती. तुमच्या माहिती साठी सांगतो की जॅकलिनने बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफाला डेट करत होती परंतु जेव्हा दिग्दर्शक साजिदसोबत जॅकलिनच्या अफेअरच्या अफवा समोर येवू लागल्या तेव्हा त्यांचे नाते तुटले. नंतर साजिद आणि जॅकलिनचेही ब्रेकअप झाले आणि सध्या ती अविवाहित आहे.

चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी पत्रकार होती

इंडस्ट्रीतील सर्वात फिट आभिनेत्रींमध्ये जॅकलिनचे नाव समाविष्ट आहे. जॅकलिनचे जिम मधील छायाचित्रे किंवा व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. जॅकलिनच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.

या कोर्समध्ये पदवी घेतल्यानंतर जॅकलिनने श्रीलंकेच्या एका टीव्ही चॅनेलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. जेव्हा ती वृत्तवाहिनीमध्ये काम करत होती तेव्हा तिचे सौंदर्य तिथल्या लोकांना खूप प्रभावित करत होते. जॅकलिन श्रीलंकेतील सर्वोत्कृष्ट दिसणारी पत्रकार होती. जॅकलिनला तिच्या लूकमुळे मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्या होत्या.

अलादीन मधुन पदार्पण केले

मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्यानंतर जॅकलिनने या क्षेत्रातही आपला हात आजमावला आणि ती ग्लॅमरच्या जगात आली .2006 मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकून ती मिस श्रीलंका बनली. 2006 च्या अलादीन चित्रपटातून जॅकलिनला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

पहिल्याच चित्रपटात तिला बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती मर्डर 2, किक, हाऊसफुल 2, रेस यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक नामांकित चित्रपटांमध्ये दिसली, पण मर्डर 2 या चित्रपटापद्वारे जॅकलिनला प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली.

‘अ‍ टॅक’ मध्ये दिसेल

जॅकलिन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. लोकांमध्ये जॅकलिनची लोकप्रियता इतकी जास्त आहे की 36.1 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. अलीकडे, जॅकलिनने तिच्या कंबरेवर टॅटू बनविला होता, ज्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

टॅटूमध्ये तिने इंग्रजी भाषेत जादू असे लिहिले आहे. जॅकलिनच्या टॅटूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, जॅकलिन लवकरच जॉन अब्राहम सोबत ‘अ‍टॅक’ या चित्रपटात दिसणार आहे. जॅकलिनशिवाय अभिनेत्री रकुल प्रीत सिंहही या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment