वाईट दिवस आठवून रडायला लागला टाइगर श्रॉफ, म्हणाला घरातील फर्नीचर विकले गेले होते, जमिनीवर झोपत होतो आणि…

टाइगर श्रॉफ बॉलीवूडमधील सर्वात उत्कृष्ठ डांसर आणि अॅक्शन अभिनेत्यांपैकी एक आहे. तो आपले सर्व स्टंट स्वतःच करतो. टाइगरने हिरोपंती चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हळू हळू टाइगर आता फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव बनला आहे.

तो ऋतिक रोशनसोबत वार चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाला होता. हा एक अक्शन चित्रपट होता ज्यामध्ये श्वास रोखून धरायला लावणारे स्टंट पाहायला मिळाले होते. चित्रपटाला यश चोप्राच्या बॅनर खाली बनवण्यात आले होते.

याच्या ट्रेलरला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. दर्शकांनी याच्या ट्रेलरला पॉजिटिव प्रतिक्रिया दिल्या होत्या. बॉलीवूडचे दोन उत्कृष्ठ अक्शन हिरो टाइगर श्रॉफ आणि ऋतिक रोशनला एकत्र चित्रपटामध्ये दर्शकांनी खूपच पसंत केले होते.

याचदरम्यान टाइगर श्रॉफने एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्याने आपले चित्रपट फ्लॉप होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. त्याने म्हंटले होते कि शाहरुख खान रोमांस किंग म्हणून ओळखला जातो तर सलमानला पाहून भाईजान आठवतो.

इथे प्रत्येक सुपरस्टारला एक लेबल लागले आहे. तसे हे इंडस्ट्रीमध्ये आवश्यक देखील आहे. तथापि जेव्हा तुम्ही काही वेगळे ट्राय करता तेव्हा थोडे रिस्क देखील असते. जसे मी फ़्लाइंग जट्टमध्ये सुपरहीरोची भूमिका केली होती. तर स्टूडेंट ऑफ़ द इयर २ मध्ये एक कॉलेज स्टूडंट बनलो होतो.

या दोन्ही चित्रपटांमध्ये दर्शकांना माझी भूमिका आवडली नाही. हि एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे टाइगर आपल्या चित्रपटांसाठी चिंतीत असतो. तसे अॅक्शन चित्रपटांमध्ये दर्शक टाइगरला खूप पसंत करतात. ऋतिक रोशनची देखील हीच अवस्था आहे.

तसे ऋतिकच्या दुसऱ्या प्रकारच्या भूमिका देखील चांगल्या चालतात. असो अशामध्ये आशा आहे येणाऱ्या काळामध्ये दोघांच्याहि अॅक्शन इमेज बॉक्स ऑफिसवर जरूर यशाचे शिखर गाठेल.

टाइगरने सांगितली आपली वेदनादायक स्टोरी :

या मुलाखतीच्या दरम्यान टाइगरने आपल्या आयुष्यातील एक असा किस्सा देखील शेयर केला जो त्याच्यासाठी खूपच वाईट होता. हि गोष्ट २००१ ची आहे. तेव्हा टाइगरच्या आईच्या प्रोडक्शन हाउसने बूम चित्रपट बनवला होता. त्यावेळी टाइगर फक्त ११ वर्षांचा होता.

झाले असे कि चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच लीक झाला. यानंतर बॉक्स ऑफिसवर देखील त्याचे खराब प्रदर्शन राहिले. अशामध्ये टाइगरच्या कुटुंबाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. टाइगर त्या दिवसांना आठवताना सांगतो कि, मला आठवणीत आहे कि आमच्या घरातील प्रत्येक फर्नीचर हळू हळू विकले गेले होते.

ज्या वस्तूंना पाहून मी मोठा झालो, त्या सर्व वस्तू गायब होऊ लागल्या होत्या. माझा बेड देखील विकला गेला. मी जमिनीवर झोपत होतो. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता.

सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर टाइगरची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. तो आपल्या चित्रपटांमधून करोडो रुपये छापत आहे. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हेही सध्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले आहेत. अशामध्ये त्यांची कमाई चांगलीच होत आहे.

Leave a Comment