वरमाला घालताच पतीला मोठमोठ्याने शि-व्या दयायला लागली पत्नी, कारण जाणून संपूर्ण वऱ्हाडाचे उडाले होश…’

आपल्याला माहित आहे की लग्न हे प्रत्येक मुला-मुलीचे एक सोनेरी स्वप्न असते. लग्नानंतर पती-पत्नीच्या जीवनात बरेच बदल घडतात. अशा परिस्थितीत प्रत्येक नवविवाहित जोडपे आपले गैरवर्तन आणि हट्ट सोडून अगदी विचार करून संसार करतात.

जेव्हा मुले लग्न करणार असतात तेव्हाच त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे महत्त्व आणि त्याची जबाबदारी समजण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत जेव्हा कुटूंबातील हे नाते दृढ होते, तेव्हा एखादा मुलगा अगदी आनंदी असतो. जसजसे त्याच्या लग्नाचे दिवस जवळ येत असतात.

तसतसे त्यांच्या हृदयाचे ठोके देखील वाढू लागतात. परंतु कधी कधी या होणाऱ्या लग्नास कोणाची तरी नजर लागते आणि ते लग्न मोडले जाते. असेच काहीसे नुकतेच एका लग्नात घडलॆ आहे, जिथे लग्नाच्या मंडपात वधू आतुरतेने आपल्या होणाऱ्या पतिची वाट पाहत होती.

जवळपास लग्नाची सर्व तयारी झाली होती यानंतर त्या होणाऱ्या जोडप्याला मंचावर वरमालाच्या विधीसाठी बोलावले गेले. पण त्याचदरम्यान वधूने वराला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर त्या वधूने तिच्या भावी पतिला चापट सुद्धा मारली.

वराला होत असलेली मारहाण पाहून मंडपातील संपूर्ण वातावरण सुद्धा तापले. आपणास सांगू इच्छितो की हे संपूर्ण प्रकरण झाशीपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडले आहे. जिथे भर लग्नात अचानक वधूने वराला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

वास्तविक, या संपूर्ण घटनेचे कारण म्हणजे वरमालाच्या वेळी एका व्यक्तीने वधूला सांगितले की तिच्या होणाऱ्या भावी पतिचे दुसर्‍या मुलीशी प्रेम संबंध आहेत आणि आता तो तिला सोडून तुझासोबत लग्न करण्यासाठी आला आहे. हे ऐकून आधी वधूची खात्री पटली नाही.

परंतु जेव्हा वधूला याबद्दल सत्य कळले तेव्हा वधू खूपच चिडली आणि तिने काहीही विचार न करता सर्वांसमोर वराला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यानंतर, त्या मुलाचे कुटुंब मात्र पार गोंधळून गेले आणि चुपचाप आपले वऱ्हाड घेऊन परत गेले.

या लग्नाला उपस्थित असलेल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार, वराच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या वेळी मुलीच्याकडून हुंडा मागितला होता आणि चार चाकी गाडी सुद्धा पाहिजे अशी अट ठेवली होती. मिळालेल्या बातमीनुसार, या दोघांचे लग्न रोख 6 लाख रुपये आणि काही दागिन्यांसह निश्चित केले गेले होते.

जिथे भारतात मुलींची पूजा करण्याचे मोठे मोठे दावे केले जातात, तिथे आजही मुलींना कुठेतरी तुच्छ मानले जाते. समाजात अशा भरलेल्या लोकांचा लोभ इतका वाढला आहे की आता लोक पैशाने व दागिन्यांनी लग्नाचा व्यवहार करतात. आजची सुशिक्षित पिढीही हुंड्याच्या लोभात अडकली आहे.

आपल्याला माहित असेल की रोज अनेक मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जातो. एवढेच नव्हे तर बऱ्याच मुलींनी हुंडयासाठी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत वधूने उचलेले हे पाऊल समाजासाठी नवीन आदर्श ठरणार आहे

Leave a Comment