वयाच्या 30 व्या वर्षीच पती व 6 मुलांना सोडून प्रियकराबरोबर पळून गेली पत्नी, 55 व्या वर्षी जेव्हा परतली तेव्हा पतीने जे केलं ते पाहून रडू लागली पत्नी पहा…’

आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये एक स्त्री वयाच्या 30 व्या वर्षी आपल्या प्रियकरासह पती आणि तिच्या सहा मुलांना सोडून पळून गेली. आणि आता 25 वर्षांनंतर ती वयाच्या 55 व्या वर्षी तिच्या पती आणि मुलांकडे परत आली.

विशेष म्हणजे तिच्या पती आणि मुलांनीही तिला स्वीकारले. हे प्रकरण गढवा जिल्ह्यातील केतार पो लिस स्टेशन परिसरातील जोगियाबिर गावातील आहे. 25 वर्षानंतर एक महिला गावी परतली. ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली होती.

तिचा प्रियकर म रण पावला तेव्हा ती तिच्या घरी परतली. जेव्हा ती घरी परत आली तेव्हा प्रथम नवरा आणि मुलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला, परंतु गावातील लोकांच्या हस्तक्षेपानंतर तिला कुटुंबाने स्विकारले.

त्यानंतर, जेव्हा ती घरी गेली तेव्हा मुलगा, सून, नातवंडे पाहून भावूक झाली. त्यांना मिठी मारून ती खुप रडू लागली. वयाच्या 30 व्या वर्षी, सहा मुले व नवर्‍याला सोडून एका प्रियक्रासह पळून गेली होती. असे सांगितले जाते की यशोदा देवी ही महिला 25 वर्षांपूर्वी 30 वर्षांची होती.

तिला सहा मुलें होते. त्याचवेळी ती पोलिस स्टेशन परिसरातील छाताकुंड येथील रहिवासी विश्वनाथ साह याच्या प्रेमात पडली. जेव्हा दोघांमधील प्रेम वाढत गेलं, तेव्हा ती पती आणि मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली.

त्यानंतर ती आपल्या प्रियकराबरोबर राहण्यासाठी छत्तीसगडच्या सीतापूरला गेली. 15 दिवसांपूर्वी तिचा प्रियकर विश्वनाथचे निधन झाले. त्यानंतर विश्वनाथच्या घरातील लोकांनीही तिला स्विकारण्यास नकार दिला. ती एकटी पडली.

तेथून तिने आपल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ती येथे पोहोचली. जेव्हा ती गावात पोहोचली, तेव्हा तिला पाहून कुटुंबातील लोक आश्चर्यचकित झाले. त्याचबरोबर तिला उद्धटपणे घराबाहेर काढले. पण ती तिथेच थांबण्यावर ठाम होती.

रात्रभर घराबाहेर थांबली. सकाळी गावातील लोकांनी या प्रकरणाचा पुन्हा एकदा शोध सुरू केला. त्याच वेळी यशोदाने गावातील लोकांना सांगितले की ती प्रियकराबरोबर राहत असली तरी ती सतत मुलांच्या संपर्कात होती. गरज पडल्यावर मुलांना आर्थिक मदतही केली होती.

त्यानंतर, मुलांनीही गावातील लोकांसमोर आईची मदत स्वीकारली. गावातील लोकांना खात्री पटवून दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला परत घरात घेण्यास सहमती दर्शविली. तिचा मुलगा आणि सुनांनी सांगितले की आता त्यांची आई त्यांच्याबरोबर राहील.

यानंतर पती नरेश साह यांनीही मान्य केले. कुटुंबीयांच्या सहमती नंतर जेव्हा ती घरात गेली तेव्हा दृश्य भिन्न होते. मुले सोडून गेलेल्या महिलेचे घर भरलेले होते. सात नातू, नऊ नाती आणि तीन नातवंडे पाहून ती भावूक झाली. तिने सर्वांना मिठी मारली आणि रडू लागली. हे दृश्य पाहून लोकही भावूक झाले.

Leave a Comment