आपल्या मोहक हास्याने लोकांना घायाळ करणार्या जूही चावलाने बर्याच काळ लोकांच्या मनावर राज्य केले. तिचा खोडकरपणा, तिचा भोळेपणा, तिची शैली आणि तिच्या साधेपणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असे. जुही आज पडद्यापासून दूर असली तरीही लोक तिची एक झलक पाहण्यासाठी वेडे होतात. जुहिची मुलगी तिच्या सारखीच खुप सुंदर आहे, पण ती माध्यमांच्या नजरेपासून खुप राहते.
जुहीची मुलगी जान्हवी
पडद्यावर आपला अभिनय आणि सौंदर्य पसरवणार्या जूही चावलाने 1995 मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केले. जुहीला जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की इतर सर्व स्टार किड्सने लहानपणापासूनच माध्यमांमध्ये ठळक बातम्या बनवण्यास सुरवात केली आहे.
पण जुहीची मुलगी जान्हवी मीडिया आणि सोशल मीडिया पासून दूर राहते. तसे, स्वतः जूहीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही आणि तिच्या मुलीलाही साधे जीवन आवडते. जूही एकेकाळी पडद्यावर राज्य करत होती, पण तिचे लग्न झाल्यावर तिने ही गोष्ट अतिशय लो-प्रोफाइलमध्ये ठेवली.
एवढेच नाही तर जूहीने आपल्या मुलांना नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. जुहीच्या दोन्ही मुलांनी धीरुभाई इंटरनॅशनल स्कूल मधून शिक्षण घेतले आहे आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनमध्ये आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात जुहीने जान्हवीचा एक फोटो शेअर केला होता, तेव्हा ती शाळेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आली होती.
जान्हवीचा आवडता स्टार
जुहीची मुलगी जान्हवी प्रसिद्धीपासून दूर राहत असली तरी ती जूहीच्या प्रॉडक्शन हाऊसमधुन चित्रपटांमध्ये प्रवेश करु शकते. वास्तविक, जान्हवीला चित्रपटांपासून दूर राहूनही दीपिका आणि वरुण धवन आवडतात. जूही अनेक कार्यक्रमांमध्ये तिच्या पतीबरोबर दिसते.
परंतु त्यांची मुले कधीच एकत्र दिसत नाही. तथापि, अशी अपेक्षा केली जावू शकते की अचानकच समोर येवुन जान्हवी सर्वांना चकित करेल. जूही चावला पडद्यापासुन दुर आहे, पण तिची बिझनेसवुमनची भूमिका अजूनही हिट आहे. जुही तिच्या नवरा जय यांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. जुही मुंबईच्या कॅम्पस कॉर्नरमध्ये पिझ्झा मेट्रो पिझ्झा नावाचे रेस्टॉरंट चालवते.
आतापर्यंतचा चित्रपट प्रवास
जुही चावला आज एक स्थापित कलाकार आहे, पण तिचा डेब्यूदेखील विलक्षण होता. 1984 मध्ये, जूहीने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले आणि मिस युनिव्हर्ससाठी पुढे पाऊल ठेवले. त्यामध्ये तिला यश मिळालं नाही, परंतु तरीही तिला सर्वोत्कृष्ट पोशाखचा पुरस्कार मिळाला.
जुहीने ‘सल्तनत’ हा पहीला चित्रपट केला, परंतु तिला हवी ती प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जुहीला रातोरात सुपरस्टार बनवले आणि चित्रपटाबरोबरच आमिर खानबरोबर तिची जोडी चमकली.
या जोडीने लव लव लव, तुम मेरे हो, दौलत की जंग, आतंक ही आतंक, हम हैं राही प्यार के या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आमिरशिवाय शाहरुख खानबरोबरही जूहीची जोडी पसंत केली गेली. शाहरुख आणि जुही यांनी राजू बन गया जेंटलमॅन, डुप्लिकेट, येस बॉस आणि डर यांसारख्या चमकदार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
जुहीची जादू पुन्हा चालू होईल
जुही चावला अधिक दिवस स्वत: ला पडद्यापासून दूर ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत जुही तिच्या जुन्या कोस्टार ऋषि कपूरसोबत एक चित्रपट करणार आहे अशी बातमीही समोर येत आहे. असे सांगण्यात येत आहे की हा चित्रपट एक कौटुंबिक नाटक असेल ज्याचे दिग्दर्शन हितेश भाटिया करणार आहेत.
त्याचे शूटिंग सुरू झाले आहे, परंतु चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. यापूर्वी जूही आणि ऋषि ह्या जोडीने साजन का घर, इना मीना डीका आणि बोल राधा बोल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी खुपच पसंत केली जाते. ऋषि यापूर्वी मुल्क या चित्रपटात दिसले होते, तर जुहीचा चॉक अँड डस्टर हा शेवटचा चित्रपट होता.