लग्न मंडपात पोहचताच पोलिसांनी मधेच थांबवले लग्न, बोलले आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, हि स्त्री नसून आहे एक..’

आपल्या सर्वाना माहित आहे की भारतीय परंपरेत लग्नाला खूप महत्व आहे, पण आपल्या समाजात असे सुद्धा काही लोक आहेत जे लोक बाल विवाहाला चालना देत आहेत आता अशाच एका लग्नात पोलिसांनी छापा टाकून एका अल्पवयीन मुलीला जीवन दान दिले आहे.

चला तर मग जाणून घेऊ की नेमकी ही घटना काय आहे. झारखंड मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये झारखंड पोलिसांनी अगदी निर्भयतेने वागून एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचविला. या मुलीचे जबरदस्तीने लग्न केले जात होते आणि या दरम्यानच पोलिसांनी या लग्नावर धाड टाकली.

आणि हे लग्न रोखले. हाती आलेल्या वृत्तानुसार झारखंड पोलिसांना एका अल्पवयीन मुलीच्या जबरी लग्नाची बातमी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला विनाविलंब लग्नातून घेऊन गेले आणि तिला एक प्रकारे जीवन दानच दिले. झारखंडमधील चत्रा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील दुंडुआ गावात रविवारी एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न होते.

लग्नाच्या विधी जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या. पण त्यानंतर मात्र पोलीस अधिकाऱ्यानी मंडप गाठले आणि लग्न थांबवून मुलीला वाचवले. या घटनेविषयी पोलिस सूत्रांनी सांगितले की, पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने लग्न लावले जात होते. या लग्नाची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तातडीने चाईल्ड लाइन अधिकाऱ्याना त्याविषयी माहिती दिली.

त्यानंतर चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी जाऊन लग्न थांबवले. चाइल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी हे लग्न थांबवले पण लग्नाचा आग्रह धरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या गोष्टीचा निषेध केला. तरीही चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी हे लग्न थांबवलं.

त्याचवेळी लग्नाअभावी तिच्या कुटुंबियांनी त्या मुलीला पुन्हा घरात घेण्यास नकार दिला आणि मुलीला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले, त्यानंतर चाईल्ड लाइन अधिकाऱ्यांनी मुलीला चाइल्ड लाइन सेंटरवर पाठविले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुलीचे प्रथम वर्णन कुटूंबियांनी प्रौढ म्हणून केले होते.

पण तिची कागदपत्रे तपासली असता ती केवळ 15 वर्षांची असल्याचे आढळले. ज्यामुळे अधिकाऱ्यांनी हे लग्न थांबवावे लागले. त्याचवेळी लग्न न झाल्याने कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी मुलीला आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला. मुलगी सध्या चत्रा चाइल्ड लाइन सेंटरमध्ये आहे.

तिथून आता तिला बाल कल्याण समितीकडे संदर्भित केले जाईल. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता मुलीने सांगितले की तिचे कुटुंब जबरदस्तीने लग्न करीत आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत असून एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न केल्याचा गुन्हादेखील दाखल केला आहे.

विशेष म्हणजे आपल्या देशाच्या कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षे आहे आणि मुलाचे लग्नाचे वय 21 वर्षे आहे. तथापि, आता सरकार लवकरच मुलीच्या लग्नाचे वय 21 वर्षे करणार आहे.

Leave a Comment