‘राम तेरी गंगा मैली हो गई’ मध्ये बोल्ड सिन देऊन चर्चेत आली होती मंदाकिनी, पण आज बघाल तर ओळखू सुद्धा येणार नाही अशी झालीय अवस्था पहा फोटो..’

बॉलिवूडची माजी अभिनेत्री मंदाकिनी हिला राज कपूरनेच लॉन्च केले असे म्हटले जाते. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ या चित्रपटाने मंदाकिनीला अत्यंत प्रसिद्ध केले. विशेषत: या सिनेमातील तिचा धबधब्याखाली अंघोळ करणारा सीन बराच काळ चर्चेत राहिला होता.

तसेच लोकांनी सुद्धा हा चित्रपट त्या सीनसाठी पुन्हा पुन्हा पाहिला होता. एकेकाळी बोल्ड आणि हॉट स्टाईलमुळे मंदाकिनीची बरीच चर्चा रंगत होती. ती आपल्याला मिथुन चक्रवर्तीसोबत बर्‍याच चित्रपटात नाचताना आणि अनेकदा आपल्याला गोविंदासोबत चित्रपटात प्रेम करताना दिसली आहे.

तिची त्याकाळी इतकी प्रसिद्धी असताना सुद्धा ती अचानकच 80 च्या दशकात मोठ्या पडद्यावरुन गायब झाली. ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ हा चित्रपट तिच्या आयुष्यातील सर्वात सुपरहिट चित्रपट होता यात काही शंका नाही. त्यानंतर मंदाकिनीला लोहा आणि तेजाब सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

पण राम तेरी गंगा मैली या चित्रपटात तिला ज्या प्रकारची भूमिका मिळाली होती, तशी भूमिका इतर कोणत्याही चित्रपटात तिला मिळू शकली नाही. मंदाकिनी हवालात, शेषनाग, कमांडो, जीत है शान से आणि जीवा अशा जवळपास 42 चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसली.

तथापि, बहुतेक चित्रपट तिचे अपयशी ठरले. मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ होते. तिचा जन्म 19 जुलै 1930 रोजी झाला होता. तिची आई मुस्लिम होती, तर तिचे वडील हे ख्रिश्चन होते.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या मंदाकिनीला केवळ वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपटांशिवाय तिने बंगाली आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. मंदाकिनीची कारकीर्द छोटी होती, पण ती अनेक वादविवादांनी सुद्धा भरली होती.

दाऊदशी सं-बंध:-

असे म्हटले जाते की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी यांचे प्रेम 90 च्या दशकाच्या सुरुवातीस खूपच फेमस झाले होते. अगदी या दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते. दाऊदला सुद्धा मंदाकिनीची इतकी आवड होती की तो तिला भेटण्यासाठी दुबईला जायचा.

दाऊदच्या प्रत्येक पार्टीमध्ये मंदाकिनी भाग घेताना आपल्याला दिसली होती. तसेच दाऊद तिच्याबरोबर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट सामने पाहतानाही दिसला होता.

त्याच्या प्रेमाची इतकी चर्चा होती की दाऊदची पत्नी महजीबिन हिला घटस्फोटाची भीती वाटू लागली होती. पण काही कारणास्तव मंदाकिनी आणि दाऊद यांच्या संबंधामध्ये अंतर आले आणि त्यानंतर ती मुंबईला परतली. असेही म्हटले जाते की मंदाकिनीला दाऊदपासून एक मुलगा सुद्धा होता.

लग्न केले:-

जेव्हा मंदाकिनीने बॉलीवूडच्या जगाला निरोप दिला, तेव्हा तिने 1995 मध्ये संत काग्यूर टी रिनपोचे ठाकुर यांच्याशी तिने विवाह केला. ती सध्या मुंबईत राहत आहे आणि ती सध्या एक तिबेटी हर्बल सेंटर चालवित आहे.

एवढेच नव्हे तर तिने आता बौद्ध धर्मही स्वीकारला आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात मर्फीचा व्हिडिओ लॉन्च झाला होता. या दरम्यान येणाऱ्या जाहिरातींमध्ये, दिसणारे एक लहान मूल, फारच कमी लोकांना माहित असेल पण ते डॉक्टर कागूर टी. रिनपो हे होते.

आता मंदाकिनीला रब्बिल नावाचा मुलगा आणि रब्बे नावाची एक मुलगी आहे आणि सध्या ती बॉलीवूड पासून चार हात लांबच आहे, तिचे संपूर्ण कुटुंब नियमितपणे योगाचा अभ्यास करतो आणि ते दलाई लामाचे अनुयायी सुद्धा आहेत.

Leave a Comment