या माणसाने केले आहेत तीन लग्न, आणि आता चौथे लग्न करण्यासाठी त्याच्या तिन्ही बायका शोधत आहे मुलगी…’

आपल्याला माहित आहे की आजची तरुण पिढी लवकर लग्न करण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही, परंतु पाकिस्तानमधील या एका तरुण मुलाची कहाणी थोडी आश्चर्यचकित करणारीच आहे, पाकिस्तान मधील हा तरुण 22 वर्षांचा आहे.

आणि त्याने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत, पण आता तो चौथे लग्न करणार आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या इतर तीन बायका त्याला चौथी पत्नी शोधण्यात मदत करीत आहेत.

या तीन पत्नीची नावे आहेत खास:-

गल्फ टुडेच्या वृत्तानुसार, सियालकोट येथील रहिवासी असणाऱ्या अदनानचे पहिले लग्न वयाच्या 16 व्या वर्षी झाले होते, पण जेव्हा तो शिक्षण घेत होता तेव्हा त्याने पुन्हा वयाच्या 20 व्या वर्षी लग्न केले आणि तिसरे लग्न गेल्या वर्षीच त्याने केले आहे.

पण यामध्ये एक गोष्ट खास आहे ती म्हणजे, त्याच्या तिन्ही पत्नीची नावे एस या इंग्रजी अक्षरापासून सुरू होतात, त्यांच्या पत्नीची नावे शुंबल, शुबाना आणि शाहिदा अशी आहेत आणि आता अदनानसुद्धा एस अक्षराच्या नावाने आपल्यासाठी चौथी पत्नी शोधत आहे.

तिन्ही बायका आहेत एकदम आनंदी:-

आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्या जोडीदाराला वेळ आणि आनंद देणे खूप अवघड आहे, पण आपल्याला आश्यर्य वाटेल कि अदनान आपल्या तिन्ही बायकांना सुद्धा खूप आनंदी ठेवतो, असे अदनान यांनी डेली पाकिस्तानला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

मी तिन्ही पत्नीवर समान प्रेम करतो. या तिघीही माझे आयुष्य आहेत, जिथे जिथे आम्हाला जायचे असते तिथे आम्ही सगळे मिळून एकत्र जातो. त्यांच्या पत्नी सांगतात की त्या तिघी सुद्धा अदनानला एकत्र कामामध्ये मदत करतात.

प्रत्येक गोष्टींमध्ये सोबत:-

अदनान आपल्या पत्नींना कसे हाताळतो या प्रश्नाला तो म्हणाला की, तिघीसाठी एकत्र कपडे विकत घेणे, एकत्र खाणे, सर्व काही एकत्र करणे, त्यामुळे आमचा महिन्याचा खर्च दीड लाखांपर्यंत पोहोचतो, पण मी अनेक स्पोर्ट्स कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो.

त्यामुळे लग्नानंतर त्याने व्यवसायात बरेच पैसे मिळवले, अदनानलाही आता चार मुले आहेत आणि नवरा-बायको यांच्यात भांडण होणे सामान्य आहे तरी सुद्धा अदनानला तीन बायका आहेत, जरी या प्रकरणात तो भाग्यवान असला तरी त्याच्या तीन बायका त्याच्याशी कधीच भांडत नाहीत किंवा कोणाशीही जळत नाहीत.

त्याची पहिली पत्नी शुंबालने त्याला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली होती, दुसरी पत्नी शुबानाने सुद्धा शाहिदाला तिसऱ्या लग्नाची परवानगी दिली होती, आता या तिघी मिळून एकत्र चौथी मुलगी शोधत आहेत.

Leave a Comment