या महिलेने मॅक-डी मधून ऑर्डर केलं होत चिकन, अर्ध खाल्ल्यानंतर त्यातून जे निघालं ते पाहून जोरजोरात रडायला लागली महिला…’

जर आपण ही मॅकडोनल्ड मध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे शौकीन असाल तर ही बातमी जाणून घेणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. आपण देखील मॅक-डी मधून अनेक पदार्थं ऑर्डर करून खात असाल. पण हे पदार्थं आपल्यासाठी घातक ठरू शकतात.

खरं तर, लीड्स यूकेमधील एका मुलीने मॅक-डी मधून चिकन नगेटस शेअर बॉक्सची ऑर्डर केली होती, परंतु ते चिकन खाल्ल्यानंतर अचानक तिला त्रास होऊ लागला आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खरं तर, अर्धा तास चिकन खाल्यानंतर, त्यात एक लाल आणि तपकिरी रंगाचा वेगळाच असा पदार्थ दिसला होता. आणि ते खाल्ल्यानंतरच तिची तब्येत बिघडली असे त्या व्यक्तीचे म्हणे होते.

मॅकडोनाल्ड्स आपल्या चविष्ट पदार्थसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मॅकडोनाल्डची फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि नग्जेट्स अगदी लहान मुलांपासून ते वडिलधाऱ्यांपर्यंत सर्वजणच मोठ्या उत्साहाने खातात. या कारणामुळे, त्यांचे जगभरात खूप ठिकाणी अनेक आउटलेट आहेत. जिथे लोक या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेत असतात.

अलीकडेच, लीड्समधील एका २३ वर्षीय लिलीने डेंटनच्या मॅक-डी मधून होम डिलिव्हरी सर्व्हिस घेताना चिकन नगेटस शेअर बॉक्स मागवला होता. डिलिव्हरी आल्यानंतर तिने तिच्या ३ वर्षाच्या मुलीसह ते चिकन पीस खाल्ले.

तिने खायाला सुरुवात केली, पण अर्धा पीस संपल्यानंतर त्यामध्ये लाल आणि तपकिरी रंगाचे काहीतरी दिसले. आणि त्यानंतर तिने ते चिकन खायचे बंद केले, परंतु ते चिकन खाल्ल्यानंतर अचानकच तिची तब्येत बिघडली.

लिलीची प्रकृती इतकी बिकट झाली होती की शेजारच्या व्यक्तीच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने सांगितले की ते पीस खाल्ल्यानंतरच तिच्या पोटात दुखू लागले आणि उलट्याचा त्रास सुरू झाला होता. तसेच त्याच वेळी, तिच्या मुलीच्या घशात सुद्धा दुखत होते.

तपासणी नंतर तिला अतिसाराचा त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वृत्तानुसार, चिकन पीस खाल्ल्यानंतरच कॅम्पिलोबॅक्टर तिच्या शरीरात सापडले, जे त्या विषबाधेसाठी जबाबदार होते.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तिला अशक्तपणा जाणवत होता. ती म्हणाली की, एक वेळ मला असे वाटले होते की मी जगू सुद्धा शकणार नाही.

मॅकेडॉनल्ड्सच्या मॅनेजरने या सर्व प्रकारानंतर तिची क्षमा मागितली. तरी लिलीने सांगितले की या नंतर तिने कधीही मॅक-डी मधून काहीच मागवले नाही.

Leave a Comment