या पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात क्लीन बो ल्ड झाली होती सुष्मिता सेन, करणार होती लग्न पण….

क्रिकेटर्स आणि चित्रपटातील तारे यांच्यातील लव्ह स्टोरी खूप प्रसिद्ध आहेत. असेही म्हटले जाते की क्रिकेट आणि फिल्मी जगतातील संबंध बर्‍याच वर्षांपासून चालू आहे. तूम्ही देखील चित्रपटातील तारे आणि क्रिकेटर्सच्या प्रेमकथेबद्दल ऐकले असेलच.

उदाहरणार्थ विराट कोहली-अनुष्का शर्मा, मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा इ. अलीकडेच हार्दिक पांड्यानेही मॉडेल नताशा स्टेनोविकसोबत लग्न केले, अशा प्रकारे अनेकदा एखादा खेळाडू एखाद्या अभिनेत्री किंवा मॉडेलच्या प्रेमात पडतो. परंतु अशा बर्‍याच कथा आहेत, ज्या अपूर्ण राहिल्या आहेत.

या भागामध्ये आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री आणि पाकिस्तानी क्रिकेटरच्या अपूर्ण प्रेमकथेविषयी सांगणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अकरमच्या प्रेमात पडली होती. अनेक वर्षांपूर्वी त्या दोघांची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती, अगदी त्यांच्या लग्नाची बातमीही चर्चेत होती. ‘पाकिस्तान, हिंदुस्थानकी एक और हसीना ले उडा ‘ यासारखे वृत्त माध्यमांमध्ये दिसू लागले, पण तसे झाले नाही.

‘वसीमसोबत लग्नाची बातमी पूर्णपणे खोटी आहे ‘ – सुष्मिता सेन

सुष्मिता आणि वसीमला अनेक वेळा एकत्र पाहिले गेले होते, अगदी एका टीव्ही कार्यक्रमात जज म्हणूनही दोघे एकत्र दिसले होते. यानंतर सर्वांचा संशय सत्यात बदलला आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. 2013 मध्ये सुष्मिता सेनने तिच्या आणि वसीमच्या अफ़ेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे संगितले.

सुष्मिताने एका ट्वीटमध्ये लिहिले की, गेल्या अनेक दिवसांपासून मी वसीम अक्रमसोबतच्या लग्नाच्या बातम्या वाचत आहे, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. तिने लिहिले, मी आणि वसीम चांगले मित्र आहोत आणि नेहमी राहू. वसीमच्या आयुष्यात एक सुंदर स्त्री आहे. यापुढे तिने लिहले , अशा अफवा अनावश्यकपणे कोणाचा तरी अनादर करत आहेत.

‘माझ्या आणि सुष्मिताच्या वैयक्तिक जीवनाचा सन्मान करा’ – वसीम अकरम

जेव्हा वसीमला सुष्मिता सेनसोबतच्या अफेअरविषयी विचारले गेले होते, तेव्हा त्याने हा मुद्दा पूर्णपणे नाकारला. वसीमने माध्यमांना सांगितले की सुष्मिताच्या वैयक्तिक जीवनाचा आदर केला पाहिजे. अकरम म्हणाला , मीडियातर्फे बनवल्या जाणार्या अशा गोष्टींमुळे मी कंटाळलो आहे. तो म्हणाला होता की, मी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकेल म्हणून मी आयपीएलमधून एक वर्षाची सुट्टी घेतली.

आत्ता मला माझे सर्व लक्ष मुलांकडे द्यावेसे वाटते. वसीम म्हणाला, मला वाटते की चाहत्यांनी आणि माध्यमांनी माझ्या आणि सुष्मिता सेनच्या वैयक्तिक जीवनाचा आदर केला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की वसीम अकरमची पत्नी हूमा 2009 साली मर ण पावली, यामुळे सर्वांना वसीम सुष्मितासोबत लग्न करणार आहे असे वाटले.

परंतु, असे झाले नाही आणि दोघांनीही लग्न नाकारले. एवढेच नाही तर या दोघांनी कधीही त्यांच नातं स्वीकारलं नाही. वसीम अकरमने 2013 मध्ये शनैरा थॉमसनसोबत दुसरे लग्न केले , तर दुसरीकडे सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शौलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Leave a Comment