या चित्रपटाच्या सेट वर करीना कपूर ने वाजवली होती बिपाशा बसू च्या कानशीळात, कारण समजल्यावर सगळेच झाले होते हैराण..

चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अशा काही कथा समोर येतात ज्या ऐकुन बर्याच लोकांना आश्चर्य वाटते तर काहींना हसू येते. प्रत्येकासोबत अशी काही तरी घटना घडतेच जी नंतर आठवली तर हसू येते. आज आम्ही तुम्हाला करीना कपूर आणि बिपाशा बसू यांची अशी एक गोष्ट सांगत आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरने बिपाशा बसुच्या कानशिलात मारले होते, चला तर सेट वर काय झाले होते ते जाणुन घ्या. या चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरने बिपाशा बसुच्या कानशिलात मारले होते. बॉलिवूड अभिनेत्रींमधिल मांजरीच्या लढाईबद्दल तुम्ही ऐकले असेलच.

असं म्हणतात की दोन नायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये मैत्रिणी होऊ शकत नाहीत आणि आज आम्ही तुम्हाला अशाच एका कथेविषयी सांगणार आहोत. 2001 मध्ये आलेला अजनबी हा चित्रपट तूम्ही सर्वांनिच पाहिला असेल आणि या चित्रपटाद्वारेच बिपाशा बासूने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

यामध्ये करीना कपूर, बॉबी देओल आणि अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले होते की तेथील सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. बातमीनुसार ‘अजनबी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपासा बासू आणि करीना कपूर यांच्यात जोरदार भांडण झाले होते, आणि करिनाने बिपाशाच्या कानशिलात खुप जोरात मारले होते.

असे झाले होती की करिना कपूरचा डिझाइनर विक्रम फडणीसने अजनबी चित्रपटाच्या सेटवर बिपासा बासूला थोडी मदत केली होती आणि करिनाला ते आवडले नाही. यामुळे करिना बिपाशा बसुवर खूप चिडली होती आणि करीनाने रागात बिपाशाला काळी मांजर म्हंटले होते. 2001 साली बिपाशा बसूने एका मुलाखतीत सांगितले होते की.

मला वाटते गरज नसताना ही गोष्ट एवढी वाढविली होती. करिनाला डिझायनर विक्रम फडणीस बरोबर काही समस्या होत्या, त्यामुळे तिने मला गरज नसताना यामध्ये घेतले. ते करिनाचे अतिशय बालिश काम होते आणि आता मी पुन्हा करीनाबरोबर कधीच काम करणार नाही. दुसरीकडे, 2002 मध्ये करीना कपूरने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की,

असे वाटत आहे की बिपाशाला तिच्या हुशारीवर विश्वास नाही कारण तिने तिच्या चार पानांच्या लांब मुलाखतीत सुमारे 3 पानं फक्त माझ्याविषयीच बोलली. बिपाशा तिच्या कामाबद्दल का बोलली नाही? इतकेच नाही तर करीना हे देखील बोलली की बिपाशाला आता पर्यंत जेवढा पण फेम मिळाला आहे.

तो माझ्यासोबत झालेल्या भांडणामुळेच मिळाला आहे. करीना कपूर आणि बिपाशा मध्ये झालेले भांडण काही वर्षांत मिटले आणि 2008 मध्ये सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघीही मिठी मारताना दिसल्या. बिपशा या पार्टीत आली होती तिने तेथे करीनाकडे मैत्रीचा हात पुढे केला होता आणि करीनानेही तो स्वीकारला. त्यांचा अजनबी हा चित्रपट सूपरहीट झाला होता.

7 जानेवारी रोजी जन्मलेली बिपाशा बसू 41 वर्षांची झाली आहे आणि तिने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तिने राज, जिस्म, धूम -२, राज-3, अलोन, बचना ए हसीनो, ओंकार, नो एंट्री, फिर हेरा-फेरी, आक्रोश, रब ने बना दी जोडी, हमशकल, मदहोशी, आत्मा, कॉर्पोरेट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2016 मध्ये तिने तिच्यापेक्षा 3 वर्ष लहान असलेल्या अभिनेता करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले आणि तेव्हापासून ती चित्रपटांपासून दूर आहे पण सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

 

Leave a Comment