या कारणामुळे सुशांत सिंगने केले होते अंकितासोबत ब्रेकअप, कंगनाच्या बहिणीचा ध क्कादायक खुलासा..

सुशांतने हे जग सोडले आहे, परंतु त्याने असे काही प्रश्न मागे सोडले आहेत, कदचित त्यांचे उत्तर कधीच मिळणार नाही. बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या निधनाला काही काळ झाला आहे, परंतु त्याच्याशी संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत येत असतात. त्याच्या आ त्मह त्ये संबंधित ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यांचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

सुशांतने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे आणि त्याचवेळी बॉलिवूडची अनेक रहस्येही समोर येत आहेत. सुशांतच्या निध नानंतर अभिनेत्री कंगनाने पुन्हा एकदा नेपोटीजमच्या मुद्द्यावरुन बॉलिवूडमधील मोठ्या व्यक्तिंना घेरले आहे. त्याचवेळी तिची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने देखील सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपविषयी मोठा खुलासा केला आहे.

कंगनाच्या बहिण रंगोलीने केला खुलासा

सुशांतसिंग राजपूतच्याआ त्मह त्येप्रकरणी कंगनाची बहिण रंगोलीने एक मोठी पोस्ट लिहिलेली आहे. तिने सुशांत आणि अंकिताचा मित्र संदीप सिंगच्या पोस्ट च्या आधारे ही पोस्ट तयार केली आहे . सुशांतच्या नि धनानंतर संदीप सिंगने सुशांतच्या आठवणीत ही पोस्ट लिहिली होती . या पोस्टमध्ये त्याने अंकिताचा संदर्भ देत असे लिहिले की केवळ तीच तुला वाचवू शकली असती.

आता या पोस्टवर रंगोली चंदेलने आपली पोस्ट लिहिली आहे. रंगोलीने लिहिले आहे की – संदीप तुम्ही अगदी बरोबर लिहिले आहे, त्याने एक खूप महागडा पीआर हायर केला होता जो मूव्ही माफियांसाठी काम करायचा. त्यांनीच सुशांतला सांगितले असेल की तु अता स्वत: साठी दुसरी जोडीदार शोधायला हवी. इथले लोक प्रेम करत नाहीत कारण इथले लोक फक्त ब्रँडिंगच्या प्रेमात पडतात. स्वत: साठी एक वेगळा ब्रँड तयार कर.

सुशांतचा जी व फक्त अंकिताच वाचवू शकली असती

पुढे रंगोलीने लिहिले – त्याच्या महागड्या पीआर टीमने म्हटले असेल की अताच वेळ आहे तुला आपल्यातील कमजोरी विसरावी लागेल आणि एखाद्या सुपर मॉडेलला डेट कराव लागेल. रणवीर किंवा रणबीर प्रमाणे एखाद्या मोठ्या फिल्मी पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा. असे टिव्ही ऐक्ट्रेस सोबत राहने तुला शोभत नाही.

तुला जर लांब शर्यतीत सामील होण्याची इच्छा असेल तर तुला त्यांचे अनुसरण करावे लागेल. त्यांच्या सारखे वागावे लागेल नाही तर तुला स्ट्रॅगलिंग अभिनेता म्हणून रहावे लागेल. सुशांत अंकिताच्या नात्याबद्दल बोलताना रंगोलीने पुढे सांगितले की – अंकिता आणि सुशांतने नवीन घर विकत घेतले होते, परंतु ते घर सोडून तो निघून गेला. यामुळे अंकिता पुर्णपणे खचून गेली होती.

सुशांत वांद्रे येथे शिफ्ट झाला जिथे त्याला त्याच्या खोट्या मित्रांनी घेरले. त्याने एका सुपर मॉडलला डेट करण्यास देखील सुरुवात केली, परंतु तो स्वतःच कुठेतरी हरवला.

अंकिताबरोबरचा बर्‍याच वर्षांचा सं बंध तुटला होता

रंगोली पुढे म्हणाली की जेव्हा मला एका मित्राच्या माध्यमातून ही माहिती मिळाली तेव्हा मला वाटलं की हे किती दिवस चालेल. आणि तसेच झाले त्याच्या त्या बनावटी पीआर आणि मित्रांनी त्याला सोडले.

सुशांत एकटा पडला आणि उदास राहू लागला. त्यांनी देखील ह्या संधिचा फायदा घेतला आणि त्याच्या वर बंदी घालून त्याचा छळ केला. 2009 साली अंकिता आणि सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून केली होती. या शोसोबतच त्यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर येऊ लागल्या होत्या. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले.

त्या दोघांच्या लग्नाच्या बातम्या देखील येऊ लागल्या, परंतु त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते . सुशांत आणि अंकिता विभक्त झाले. ब्रेकअपनंतरही अंकिता आणि सुशांत चांगले मित्र बनुन राहिले. आज सुशांत अंकितापासून दूर निघुन गेला, परंतु तो नेहमीच तिच्या मनात जि वंत राहील.

Leave a Comment