आज आम्ही आपल्याला अशी एक बातमी सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुमच्या तळपायांतील आग मस्तकात जाईल, होय कारण खूप लज्जासप्पद अशी गोष्ट आपल्या भारतीय जवानांसोबत घडली आहे ही गोष्ट जाणलं तर आपण सुद्धा हैराण व्हाल, चला तर मग नेमके काय घडेल आहे ते जाणून घेऊ.
आपणास सांगू इच्छितो की नुकतीच उत्तर प्रदेश पोलिसांनी एक कारवाई केली आहे ज्यामध्ये एका कॉलगर्ल आणि तिच्या टोळीला अटक केली आहे. हे लोक आपल्या सैन्याच्या जवानांना सापळा लावून त्यांना फसवत असत. आता याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने सैन्याच्या जवानांशी मैत्री केली आणि नंतर तिने त्यांना हॉटेलमध्ये बोलावले. यावेळी त्यांचे अ-श्लिल व्हिडिओ बनविण्यात आले आणि या व्हिडिओच्या आधारे सैनिकांकडून पैशांची फसवणूक केली गेली. मेरठ पो-लिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सैन्याच्या एका शिपायाने सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याने पोलिसांना सांगितले की मेरठ येथील एका मुलीने त्याला हॉटेलमध्ये बोलावले आणि त्याची फसवणूक केली. जवानांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपी मुलीला पकडले.
खरं तर पोलिसांच्या तक्रारीवरून हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्याच्या मदतीने त्या महिलेची आणि तिच्या एका साथीदाराची ओळख पटवली. त्यानंतर नौचंडी पोलिसांनी त्यांना पकडले. पकडल्यानंतर त्या मुलीची चौकशी करण्यात आली ज्यात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आणि तिच्या अन्य साथीदारांची नावेही तिने उघड केली.
पोलिसांनी महिलेसह तीन जणांना अटक केली, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिस सतत दबाव टाकत आहेत. सायबर सेल आणि मेरठ पोलिस एकत्र या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशी दरम्यान आरोपींनी कबूल केले की ते सैन्याच्या जवानांची फसवणूक करत होते.
त्यांनी राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या सैनिकांना लक्ष्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी डझनभराहून अधिक जणांची फसवणूक केली आहे. या मुलीने मुझफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या सैन्याच्या जवानांकडून सोन्याच्या दागिन्यांचीही फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुण युवतीच या टोळीची लीडर आहे.
आरोपीने प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून सैन्यातील जवानांशी मैत्री केली. त्यानंतर हॉटेलमध्ये त्यांना ती भेटायला बोलवत असे. जेव्हा ते हॉटेलमध्ये यायचे तेव्हा त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले गेले. यानंतर या सैन्यातील युवकाला मुलीने ब्लॅकमेल करून पैशाची फसवणूक केली. तिचे दोन साथीदारही या कामात सामील होते.
आरोपी मुलीकडून पोलिसांना 12 बनावट आयडी मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते प्रत्येक जवानांशी वेगवेगळ्या आयडीने बोलत असत. आरोपी मुलगी जवळपास एक वर्षापासून हनी ट्रॅपच्या जाळ्यातुन सैन्याच्या जवानांना अडचणीत आणत होती.
काही दिवसांपूर्वी तिने हरियाणा येथे एक जवानाला बोलावले होते त्यानंतर ती त्या फौजीला हॉटेलमध्ये घेऊन गेली, जिथे तिने त्याच्या सोबत अश्लील व्हिडिओ बनवला आणि ती युवती सर्व सामानासह हॉटेलमधून पळून गेली. अशा प्रकारे तिने अनेक सैन्याच्या जवानांना गंडा घातला आहे.