मुलाला बायकोवर रस्त्यातच आला होता शक, मंडपापासून 3 किलोमीटर पुढे गेल्यावर जेव्हा तिचा बुरखा केला वर, तर ती निघाली त्याचीच ..’

संत कबीर नगरमधील बखिरा पोलिस स्टेशन परिसरात एक लग्न चालू होते, अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये हे लग्न होत होते. या लग्नाला केवळ पाच पंन्नासच लोक उपस्थित होते आणि लग्न झाल्यानंतर वधूला निरोप देण्यात आला.

पण वऱ्हाड सुमारे तीन किमी पुढे गेल्यानंतर अचानक वराला संशय आला की त्याची बायको म्हणजेच वधू बदलली आहे. यानंतर वराने रागाच्या भरात वधूला तिच्या घरी सोडून तो परत जाऊ लागला. यावेळी उपस्थित मुलीच्या घरातील लोकांनी वराला असे करण्यास मनाई केली यावरून त्याच्यामध्ये बराच हंगामा चालू होता.

वधू अजिबात बदली नाही यावर मुलीकडील लोक ठाम होते तर इकडे वर मुलगा सुद्धा त्याच्या आरोपांवर ठामपणे उभा राहिला. याच्या मधील होणारा वाद पाहून अनेक लोक आजूबाजूला जमा झाले. असे सांगितले जात आहे की या वराला तेव्हा एका खुर्चीवर बांधून ठेवले होते.

आणि सुमारे तीन-चार तासानंतर वराला ओलिसातून मुक्त करण्यात आले होते. मुलीकडील लोकांनी या मुलाला लाथाबुक्क्यांनी चांगलीच मारहाण केली होती त्यामुळे मुलाची अवस्था खूपच गंभीर बनली होती. शेवटी हे लग्न मोडण्यात आले, त्यामुळे लग्न तुटल्यावर मुलीकडील लोकांनी खर्चाच्या नावाखाली तीन लाख रुपयांची मागणी वराकडील लोकांना करण्यात आली.

लग्नात या मुलाला एक घड्याळ सुद्धा देण्यात आले होते ते सुद्धा त्याच्या कडून काढून घेण्यात आले. तो मुलगा खूपच घाबरला होता तो म्हणाला की मी खूप गरीब आहे आणि इतका पैसा मी तूम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला पुन्हा रात्रभर एका बंदिस्त खोलीमध्ये बांधून ठेवण्यात आले.

पण काही काळाने एक व्यक्तीने हे प्रकरण पोलिस ठाण्यात कळवले. त्यामुळे कधी नाही तेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वर आणि त्याच्या चुलतभावाची तेथून सुटका करण्यात आली आणि त्या मुलीच्या कुटूंबाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

जिथे दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणजे ऐकून घेण्यात आले. प्रभारी निरीक्षक रोहित प्रसाद म्हणाले की, या संदर्भात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू आहे. हे दोघेही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment