आपण असे बर्याचदा ऐकले आहे की एखाद्याचे प्रेम अमर होते आणि ते या जगातून गेल्यानंतरही त्यांची प्रेमकथा आपल्याला आठवते, परंतु ही कहाणी अशा एका प्रेमाची आहे ज्यात एका महिलेने एखाद्या मृत व्यक्तीवर प्रेम केले होते आणि ती त्या प्रेताला आपला पति बनवते.
हा होय, उत्तर आयर्लंडच्या डाउपेटट्रिक येते राहणाऱ्या ४५ वर्षीय अमांडा टीएजी ही चक्क एका भूताच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांचेही प्रेमसंबंध खूप जुने होते आणि अखेर दोघांचेही लग्न झाले.
तीन शतका आधीचे प्रेम होते:-
अमांडाचे प्रेम आणि आता पती जॅक यांचे ३०० वर्षांपूर्वी निधन झाले होते. अमांडाच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा हा हैतीयनचा समुद्री दरोडेखोर होता आणि त्याचा मृत्यू १७०० च्या दशकात झाला होता. तिने तिच्या पतीला कधीच पाहिले नाही.
परंतु तिला वाटले होते की तो पायरेट्स ऑफ द कॅरिबियन कॅप्टनच्या जॅक स्पॅरोसारखा असेल. या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि जॅकच्या उपस्थितीचे प्रतिकात्मक विचार करून त्याची अंगठी एका तलवारीवर ठेवली होती.
पहिलाच झाले होते लग्न:-
अमांडाने यापूर्वी एका व्यक्तीशी लग्न केले होते आणि तिला पाच मुले सुद्धा झाली होती. आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झालेली अमांडा सांगते की जॅकबरोबर तिला जे काही वाटलं तसे तिला इतर कुणाबद्दलच वाटले गेले नाही. अमांडाच्या मते, तिने जितके जॅकला जाणून आणि समजून घेतले होते, तितकाच तो तिला आवडत गेला आणि त्याचे प्रेम वाढत गेले.
स्वप्नामध्ये लग्न करण्याचे ठरविले:-
या कथेचा सर्वात विचित्र ट्विस्ट म्हणजे एक दिवस जॅकने स्वप्नात अमांडाला सांगितले की ते दोघेही एक होऊ शकतात, परंतु त्याआधी अमांडाने मनुष्य आणि आत्मा यांच्यातील इतके जवळचे नाते कधी ऐकले नव्हते आणि पाहिले देखील नव्हते. नंतर तिने या विषयावर बरेच संशोधन केले आणि तिच्या लक्षात आले,
की खरोखरच माणूस आणि आत्मा यांच्यात एक खोल नाते आहे. अमांडाने हे उघड केले की जॅकने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही लग्न केले नाही आणि तो एक शक्तिशाली आत्मा आहे. या अनोख्या प्रेमकथेत अमांडाच्या कुटुंबियांनीही तिचे समर्थन केले होते.