बॉलीवूड च्या या टॉप अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाला होता जॉन अब्राहम, या एका चुकीमुळे झाले होते ब्रेकअप….

एक काळ असा होता की जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू या जोडीची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि प्रत्येकाला असे वाटत होते की जॉन आणि बिपाशा लग्न करतील. पण हे होऊ शकले नाही आणि 9 वर्षांपर्यंत चाललेल्या प्रेम प्रकरणानंतर अचानक त्यांचे नातं तुटलं आणि ते दोघे वेगळे झाले.

त्यांच्या अचानक विभक्त होण्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला. असे काय कारण होते की या दोघांचे संबंध इतके खराब झाले की, जे एकमेकांवर प्रेम करत होते ते आज बोलतही नाहीत? आजही हा प्रश्न बर्‍याच लोकांसाठी नसुटलेला आहे.

जॉन आणि बिपाशाचे नाते कसे सुरू झाले:

दोघांचे ब्रेकअप का झाले? हे माहीत करण्याअगोदर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्यातील संबंध कसा सुरू झाला हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. जॉन आणि बिपाशाने 2003 मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ येऊ लागले आणि दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले.

येथूनच त्यांचे नाते सुरू झाले. यापूर्वी, बिपाशा बसू ‘राज’ चित्रपटाचा अभिनेता राज दिनो मोरेयाला डेट करत होती, नंतर जेव्हा तिची जॉन अब्राहमशी मैत्री झाली तेव्हा ती दिनो मोरेयापासून दुर झाली. त्यावेळी जॉन आणि बिपाशा यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांचे बरेच चित्रपट हिट झाले होते.

हळूहळू या दोघांचं प्रेम वाढू लागलं आणि बॉलिवूड कॉरिडोरमध्ये त्यांच्या अफेअरविषयी बरीच चर्चा सुरू झाली. या दोघांनी एकमेकांना 9 वर्षे डेट केले आणि बिपाशा बसू जॉनबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. हे सर्व चालू असताना 2014 हे वर्ष आले होते आणि या वर्षाचा पहिलाच दिवस होता जेव्हा जॉनने एक चूक केली आणि त्या दोघांचे संबंध संपुष्टात आले.

काय होती जॉन अब्राहमची ती एक चूक :

खरं तर जॉनला प्रिया रुंचल आवडत होती जी आता जॉन अब्राहमची पत्नी आहे आणि त्याने हे बिपाशा पासुन लपवून ठेवले होते. जॉन आणि बिपाशा वर्कआउटसाठी ज्या जिममध्ये जात होते तेथे या दोघांची एक सामान्य मित्र म्हणून भेट झाली होती. तुम्हाला हे आधीच माहित असेल की जॉन आणि बिपाशा त्यांच्या तंदुरुस्तीची भरपूर काळजी घेतात.

त्यावेळी जॉनने बिपाशाला हे कळू दिले नाही की त्याला प्रिया रुंचल आवडते. पण 2014 मध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉनने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते, ज्यात त्याने आपल्या आणि प्रियाच्या नात्याबद्दल संपूर्ण जगाला सांगितले होते.

जॉनने ट्विटमध्ये लिहिले- ‘यावर्षी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि खुप सारा आनंद यावा .. जॉन आणि प्रिया अब्राहम वर प्रेम करा’. या ट्विटमुळे बिपाशाला जॉनच्या रिलेशनशिपविषयी सर्व समजले आणि ती खूप चिडली. बिपाशाला खुप वाईट वाटले त्यामुळे तिने जॉनशी ब्रेकअप केले.

आजही एकमेकांसोबत बोलत नाहीः

एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले की जेव्हा तिला जॉनच्या नात्याबद्दल कळले तेव्हा तिला धक्का बसला आणि त्यावर विश्वासच बसला नाही. या धक्क्यामुळे बिपाशाने लोकांना भेटणेदेखील सोडले होते. ब्रेकअपच्या इतक्या वर्षानंतरही जॉन आणि बिपाशा एकमेकांशी बोलत नाहीत.

जॉननंतर, बिपाशानेही 2016 मध्ये करण ग्रोव्हरसोबत लग्न गाठ बांधली. करण ग्रोव्हरचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे यापूर्वी त्याचे दोन लग्न झालेले होते.

Leave a Comment