बॉलीवूड च्या या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झालीय सोनाक्षी सिन्हा, बोलली लग्न करेल तर फक्त या याच्याशीच..’

बॉलिवूडमध्ये या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त विवाहसोहळ्यांविषयी चर्चा सुरू आहे. दीपिका रणबीरचे लग्न, आलिया रणवीरचे लग्न, अर्जुन मलायकाचे लग्न, सध्या एकामागुन एक बॉलिवूड सेलेब्सच्या विवाहांमध्ये बॉलिवूड व्यस्त झाले आहे. या सर्वांशिवाय बॉलिवूडची आणखी एक सेलिब्रिटी आहे जी तिच्या लग्नाबद्दल बोलली आहे.

आम्ही बॉलिवूडच्या दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलत आहोत. अलीकडेच एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत जेव्हा सोनाक्षी सिन्हाला तिच्या लग्नाबद्दल विचारले गेले की तिला तिचा जीवनसाथी कसा हवा आहे,

तेव्हा सोनाक्षी म्हणाली, “ज्याच्याशी मी लग्न करेल त्याने मला मोकळीक द्यायला हवी, मला कोणत्याही बंधनात ठेवू नये” या बरोबरच सोनाक्षीने लवकरच लग्न करणार असलेल्या मुलींनाही सल्ला दिला, सोनाक्षी म्हणाली,’ तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत लग्न करायचे आहे त्याच्यासोबतच करा कधीही चुकीच्या मार्गाने लग्न करु नका.’

जेव्हा सोनाक्षीला तिच्या लग्नाविषयी विचारले की तिला कोणाबरोबर लग्न करायचे आहे आणि तिचा कुणावर क्रश आहे तेव्हा यावर सोनाक्षी म्हणाली की, हृतिक रोशनवर माझा क्रेश आहे. मी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात त्याला पहिल्यांदा पाहिले होते आणि तेव्हापासून तो मला आवडतो”.

सोनाक्षीचे नाव सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा मेहुना बंटी सचदेवाशी संबंधित होते, तिच्या आणि बंटीच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा झाली होती, असे ऐकायला आले होते की बंटी आणि सोनाक्षीचे प्रेमसंबंध होते, परंतु काही काळानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले.

आजकाल, विकी कौशलसोबत सोनाक्षीचे नाव जोडले जात आहे, या दोघांनी ‘ब्राइड्स टुडे’ मासिकासाठी एकत्र फोटोशुट केले होते ज्यामध्ये हे दोघे एकमेकांसोबत खुप चांगले दिसत होते आणि या फोटोंमध्ये दोघांमधील केमिस्ट्री स्पष्ट दिसत होती.

सोनाक्षीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती सलमान खानसोबत दबंग चित्रपटाच्या तिसर्या भागात दिसणार आहे. बातमीनुसार ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार नाही, तर या चित्रपटात तिची एक छोटी भूमिका असणार आहे पण ती खूप महत्वाची असेल.

यासोबतच ती ‘कलंक’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसमवेत वरुण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि संजय दत्तही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया आणि वरुण काही दिवसांपूर्वी कारगिलला गेले होते तेथे त्यांच्या चित्रपटाचे काही सीन शूट करण्यात आले होते.

Leave a Comment