बॉलीवूडच्या या टॉप 5 अभिनेत्रीचा जन्म बिहारमध्ये झाला असून कधीच केले नाही, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम….

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही, पण जर आपण भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोललो तर भोजपुरी चित्रपटांचे जगभर अनेक चाहते आहेत. बर्याच काळापासून बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी लोकांना फार आवडतात. परंतु या दिवसांमध्ये लोकांना भोजपुरी चित्रपटांमधील गाणी देखील आवडतात.जसजसा काळ जात आहे, तसतसे लोकांमध्ये भोजपुरी गाण्यांबद्दलचा क्रेझ वाढताना स्पष्ट दिसत आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या यूपी बिहारमधून आल्या आहेत. आणि त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एक चांगले स्थान मिळवले आहे. भोजपुरी चित्रपटांनी गेल्या १० वर्षात सातत्याने बरेच यश मिळवले आहे. अभिनयाचा विषय असो किंवा भोजपुरी चित्रपटांच्या कथेचा, काळानुसार यामध्ये बर्याच सुधारणा झाल्या आहेत आणि तांत्रिकदृष्ट्याही बरेच बदल दिसत आहेत.

आज भोजपुरी चित्रपटांचे तारे जगभर प्रसिद्ध झाले आहेत, आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून अशा काही खास अभिनेत्रींची माहिती देणार आहोत ज्या यूपी बिहारच्या आहेत पण त्यांनी अजुनही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेले नाहीत. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सर्वाधिक पैसे आणि नाव कमवत आहेत. परंतु अजुनही त्या भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत.

नीतू चंद्रा

भारतीय चित्रपट अभिनेत्री नीतू चंद्राचे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक चांगले नाव आहे, तिने बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अनेक बड्या स्टार्स बरोबर काम केले आहे, नीतू चंद्राचा जन्म 20 जुन 1984 रोजी बिहारची राजधानी पटना येथे झाला आहे. नीतू चंद्राने हिंदी चित्रपटसृष्टित अक्षय कुमारसोबत “गरम-मसाला” चित्रपटातून पाऊल ठेवले होते, या चित्रपटामधील तिची भूमिका लोकांना फार आवडली होती. तिचा जन्म बिहारची राजधानी पटना येथे झाला आहे तरी देखील तिने आजपर्यंत भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेले नाही.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राला कोण ओळखत नाही? प्रियंका चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर ती हॉलिवूडकडे वळली, प्रियंका चोप्राचा जन्म 18 जुलै 1982 रोजी जन्म बिहारमधिल जमशेदपुर येथे झाला होता, आता जमशेदपूर झारखंडचा एक भाग झाला आहे, अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज पर्यंत कोणत्याही भोजपुरी चित्रपटात दिसली नाही.

नेहा शर्मा

नेहा शर्मा एक चांगली अभिनेत्री तसेच एक भारतीय मॉडेल आहे. तिचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारच्या भागलपूर येथे झाला होता, तिने 2007 मध्ये मोहित शर्माच्या “क्रुक” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तिने साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. बिहारमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने अजुनही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेले नाही.

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारची राजधानी पटना येथे झाला होता आणि ती अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. तिने देखील कोणत्याही भोजपुरी चित्रपटात काम केलेले नाही.

संदली सिन्हा

संदली सिन्हा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिने हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या निरागस डोळ्यांनी आणि स्मित हास्याने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. संदली सिन्हाचा जन्म 11 जानेवारी 1972 रोजी मुजफ्फरपुरात झाला.

तिने अनुभव सिन्हाच्या “तुम बिन” या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर ती एक उत्कृष्ट अभिनेत्री बनली, पण त्यानंतर तिचे करिअर फारसे यशस्वी ठरले नाही, तिने देखील भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published.