बॉलिवूड च्या या 5 सेलिब्रिटीं सोबत होते करण जोहरचे अफेर, फोटो पाहाल तर धक्का बसेल तुम्हाला…

बॉलिवूडचा सर्वात नामांकित आणि लोकप्रिय चेहरा असलेला चित्रपट निर्माता करण जोहर आजकाल खुप चर्चेत आहे. याक्षणी करण जोहर नेपोटीजम आणि डिसक्रिमिनेशन या विषयांमुळे चर्चेत आहे. खरं तर, सु शांतसिंग रा जपूत आत्मह त्या प्रकरणानंतर चाहत्यांसह बॉलिवूडचे अनेक स्टार्स देखील करण जोहरवर नेपोटीजम पसरवल्याचा आरोप करत आहेत.

करण जोहरवर नेपोटीजमचा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. या पूर्वीही अनेकदा नेपोटीजम आणि डिसक्रिमिनेशन या विषयांनी त्याला घेराव घातला होता. याशिवाय करण जोहरशी संबंधित आणखी एक प्रकरण सर्वाधिक चर्चेत राहते, ते म्हणजे त्याची लव्ह लाइफ.

करण जोहरच्या लैं गिकतेबद्दल आणि त्याच्या नात्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तसेच सोशल मीडियावरही त्यांची खिल्ली उडविली जाते. पण करण जोहर या विषयावर कधीही बोलत नाही. हेच कारण आहे की आजपर्यंत करण जोहरची प्रेमाची आवड हे एक रहस्य आहे.

इतकेच नाही तर अनेक पुरस्कार कार्यक्रमांमध्येही करणची खिल्ली उडवली जाते. बर्‍याच कलाकारांसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची चर्चाही झाली. पण करण याविषयी कधीही माध्यमांशी खुलेपणाने बोलला नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की करण जोहरबरोबर कोणत्या नामांकित व्यक्तींचा संबंध आहे.

करण जोहर – ट्विंकल खन्ना

करण जोहरचे पहिले प्रेम दुसरे कोणीही नसुन ट्विंकल खन्ना होती. हे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. शिक्षण घेत असताना करण ट्विंकलच्या प्रेमात पडला. करण त्याच्या मनात काय आहे हे ट्विंकल खन्नाला सांगणार त्या आधीच अक्षय कुमार आला आणि त्याने ट्विंकलला जोडीदार बनवलं. एक मजेशीर किस्सा म्हणजे करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात ट्विंकल खन्नासाठी अंजलीचे पात्र ठेवले होते, पण ट्विंकल खन्नाने ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

करण जोहर-शाहरुख खान

करण आणि शाहरुखच्या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोघांच्या या निकटपणामुळे त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आजही शाहरुख आणि करणविषयी अनेक विनोद इंटरनेटवर उपलब्ध आहेत. एकदा शाहरुख खाननेही कॉफी विथ करणमध्ये यावर विनोद केला होता. मात्र, करण जोहरने त्याचे जीवन चरित्र एन अनसुटेबल बॉयमध्ये लिहिले आहे की शाहरुख त्याचा एक चांगला मित्र आहे आणि तो शाहरुखला वडिलांप्रमाणे मानतो.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि करण जोहर

करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा सिद्धार्थ मल्होत्रा ​​’माय नेम इज खान’ चित्रपटात करणला सहाय्य करत होता तेव्हा करण आणि सिद्धार्थची मैत्री सुरू झाली. दोघांची मैत्री इतकी खोलवर गेली की ते सुट्टीवर पॅरिसलाही गेले होते. त्यानंतर करणने सिद्धार्थला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधुन बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. असं मानलं जातं की करण जोहरला सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व खूपच आवडले होते त्यामुळे तो त्याच्या प्रेमात पडला होता.

मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर

फॅशन डिझायनर्स मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर यांच्यातील नात्याबद्दलही चर्चा झाली होती, दोघांची बॉन्डिंग इतकी खोलवर गेली होती की त्यांच्या जोडीला मोस्ट स्पेक्युलेटेड कपल म्हणून ओळखले जात होते. दोघेही एकमेकांना बर्याच काळापासून ओळखत होते, म्हणूनच त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल बरीच चर्चा रंगली. दोघांनाही बर्‍याचदा पार्ट्यांमध्ये स्पॉट केले गेले होते, एकदा करण जोहरने मनीषसोबत खास संबंध असल्याचेही म्हटले होते. मात्र, या दोघांनी कधीही नातं स्वीकारलं नाही.

करण जोहर आणि एकता कपूर

एकता कपूरचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण 2000 साली एकता आणि करणच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. बर्‍याच वेळा या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही माध्यमांमध्ये पसरल्या होत्या, परंतु या सर्व अफवा होत्या.

Leave a Comment