बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने डायरेक्टर सुभाष घईवर केले गंभीर आरोप, म्हणाली सुभाष घई यांनी मला एका खोलीत बोलवून करायला लावली हि गोष्ट..

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्री आजकाल आतील आणि बाहेरील अशा दोन गटांमध्ये विभागलेली दिसत आहे. येथे दररोज नविन आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. याच अनुक्रमे बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.

सुभाष घई हे त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपट दिग्दर्शक होते. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीला त्यांनीच लाँच केले होते. 1997 मध्ये महिमा चौधरीने शाहरूख खानसोबत ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता महिमा चौधरीने सुभाष घईवर मोठा आरोप केला आहे.

तिने सुभाष घईवर धमकावल्याचा आरोप केला आहे आणि असेही म्हटले आहे की सुभाष घई यांनी इतर निर्माते व दिग्दर्शकांना निरोप देवून सांगितले होते की तिला त्यांच्या चित्रपटांत कास्ट करू नये.

महिमा चौधरी काय म्हणाली ?

महिमा चौधरीने या गोष्टीचा खुलासा केला आहे की सुभाष घई यांनी तिला एका खोलीत बोलवले जिथे कोणीच नव्हते. तेव्हा त्यांनी इतर कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाबरोबर काम न करण्यासाठी धमकावले होते. महिमा चौधरीने सांगितले की 1998 किंवा 1999 मध्ये सुभाष घई यांनी ट्रेड गाईड मासिकात तिच्या फोटोसह एक जाहिरात दिली होती.

त्यांनी त्यात लिहिले होते की ज्या कोणाला महिमा चौधरी सोबत काम करायचे असेल त्याने त्यासाठी सुभाष घई यांच्याशी संपर्क साधावा. या जाहिरातीमध्ये सुभाष घई यांनी दावा केला होता की महिमा चौधरी यांनी त्यांच्याबरोबर करार केला आहे. यामुळे, त्यांच्या परवानगीशिवाय ती इतर कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाबरोबर काम करू शकत नाही. तथापि, याबद्दल महिमा चौधरी म्हणाली की तिने सुभाष घई यांच्याशी कधीही असा करार केला नव्हता.

या चौघांनी मदत केली

महिमा चौधरीने सांगितले की तिला सलमान खान, डेव्हिड धवन, संजय दत्त आणि राजकुमार संतोषी यांनी मदत केली होती. डेव्हिड धवनने तिला बोलावून सांगितले की त्यांना अजिबात घाबरू नको. महिमा चौधरीने सांगितले की त्यावेळी तिला बॉलीवूडमधील या चौघांशिवाय इतर कोणाचाही फोन आला नव्हता.

रामगोपाल वर्मा 1998 मध्ये ‘सत्या’ हा सुपरहिट चित्रपट बनवत होते. या चित्रपटात महिमा चौधरीला घेतले होते. महिमा चौधरीने सांगितले की राम गोपाल वर्मा यांनी तिला न सांगता उर्मिला मातोंडकर यांना तिच्या जागी घेतले. माध्यमांमध्ये जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगची बातमी सुरू झाली तेव्हा महिमा चौधरीला याबद्दल माहित झाले.

यापूर्वी ही आरोप झाले आहेत.

सुभाष घई यांच्यावर असे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. रीना गोलन या इस्त्रायली मॉडेलने देखील तिच्या पुस्तकात सुभाष घई वर आरोप केला होता की ते तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये घेऊन जात होते. इतकेच नाही तर मॉडेल आभिनेत्री केट शर्मानेही सुभाष घईवर वर्ष 2018 मध्ये जबरदस्ती किस करण्याचा आणि मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. तसे, मुंबई पोलिसांनी नंतर चौकशीत सुभाष घई यांना क्लीन चिट दिली होती.

Leave a Comment