बी-ग्रेड चित्रपटसुद्धा केला होता माधुरी दीक्षितने, डायरेक्टरने केली होती अशी वर्तवणूक

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तेजाब आणि राम लखन चित्रपट केल्यानंतर रातोरात सुपरस्टार बनली होती. आज माधुरी ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचणे तिला इतके सोपे नव्हते.

ज्येष्ठ चित्रपट पत्रकार अली पीटर जॉनने विटनेसिंग वंडर्स नावाने एक पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी माधुरी दीक्षितच्या फिल्मी करियरच्या सुरवातीचा एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे कि सुरवातीला माधुरी दीक्षितला नाईलाजाने बी-ग्रेड चित्रपटांमध्येसुद्धा काम करावे लागले होते.

एका रुममध्ये आईवडिलांसोबत

आपल्या आईवडिलांसोबत माधुरी एका रुमच्या फ्लॅटमध्ये राहत होती. माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती. जेव्हा ती फक्त ९ वर्षांची होती तेव्हा महाराष्ट्र शासनाकडून भरतनाट्यम आणि कथक स्पर्धा झाली होती

ज्यामध्ये तिने पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या शेजारी लेखक आणि दिग्दर्शक गोविंद मुनीस राहत होते. त्यांनी माधुरीला पाहिले तेव्हा तिच्यामध्ये त्यांना एक अभिनेत्री दिसली. गोविंद मुनीसने माधुरी दीक्षितच्या आईवडिलांसोबत बातचीत केली.

त्यांनी सांगितले कि त्यांच्या मुलीसाठी ते एखाद्या चित्रपटासाठी बोलणी करणार आहेत. माधुरी दीक्षितच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यावेळी खूपच बिकट होती. आईवडिलांनी यामुळे त्यावेळी सहमती दर्शवली.

राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये

यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या अबोध चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितला संधी मिळाली. तथापि तिचा हा चित्रपट खूपच वाईटरित्या फ्लॉप झाला त्यानंतर इतरही चित्रपट करण्याची माधुरी दीक्षितची इच्छा होती

पण पहिला चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर तिला चित्रपट मिळण्यास अडचण येऊ लागली. मग यादरम्यान एक दिग्दर्शक सुदर्शन रतनने तिला बी-ग्रेड चित्रपटामध्ये काम करण्यासाठी साईन केले होते. चित्रपटाचे नाव हत्या होते आणि शेखर सुमन या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होता.

दिग्दर्शकाची वर्तवणूक

जेव्हा या चित्रपटाचे शुटींग चालू होते त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक माधुरीसोबत खूपच वाईट वर्तवणूक करत होते. सेक्स सारख्या विषयावर तो चित्रपट बनवू इच्छित होता आणि काही बोल्ड सीन सुद्धा माधुरी कडून तो करवून घेणार होता.

अशामध्ये माधुरी दीक्षितच्या आईवडिलांनी असे करण्यास नकार दिला होता. यानंतर जवळजवळ ६ महिन्यांपर्यंत माधुरी दीक्षितच्या कामाचे मानधन या व्यक्तीने दिले नव्हते. नंतर फायनान्सरनेही चित्रपटामधून काढता पाय घेतला.

या कारणामुळे चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. माधुरी दीक्षित जेव्हा स्टार बनली तेव्हा अनेक टीव्ही चॅनेल्सवर हा चित्रपट जसाच्या तसा दाखवण्यात आला होता ज्याप्रकारे तो बनवण्यात आला होता.

रात्री उशिरा या चित्रपटाचे प्रसारण करण्यात आले होते. कधीही माधुरी दीक्षितने हि गोष्ट उघड केली नाही कि शेखर सुमनसोबत तिने काम केले होते.

नंतर सर्वकाही बदलले

या चित्रपटाच्या शुटींगनंतर माधुरी दीक्षितच्या करियरला एक मोठे वळण मिळाले. त्या काळातील सर्व प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर म्हणून राकेश श्रेष्ठला ओळखले जात होते. त्यांनी स्टुडीओमध्ये माधुरी दीक्षितला पाहिले होते.

अशामध्ये तिच्या आईवडिलांकडे जाऊन त्याने त्यांच्या मुलीचे काही फोटो काढण्याची परवानगी मागितली होती. श्रेष्ठने माधुरी दीक्षितचा पोर्टफोलियो तयार केला होता आणि याला त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घईला दाखवले होते.

योगायोगाने याच चित्रपटाच्या सेटच्या आसपासच सुभाष घईच्या एका चित्रपटाचे शुटींग चालू होते. एक दोन वेळा त्यांनीसुद्धा माधुरी दीक्षितला पाहिले होते.

तथापि जेव्हा श्रेष्ठने त्यांना माधुरी दीक्षितच्या पोर्टफोलियो मधील फोटो दाखवले तेव्हा सुभाष घई म्हणाले कि मुक्ता आर्ट्सला त्यांची नवी हिरोईन मिळाली आहे. त्यानंतर माधुरी दीक्षित च्या करियरला गती मिळाली.

Leave a Comment