बालिका वधूच्या ‘आनंदी’ ने निवडला तिचा जोडीदार, स्वतःपेक्षा 18 वर्षांनी मोठ्या या व्यक्तीशी केलय लग्न…

बालिका वधू ही छोट्या पडद्यावरची अशी मालिका आहे जी जवळजवळ सर्वांनीच पहिली असेल. हि मालिका 21 जुलै 2008 रोजी प्रसारित झाली होती आणि तिचा अंतिम भाग 31 जुलै 2016 रोजी प्रसारित करण्यात आला होता.

या वेळी टीआरपीमध्ये या मालिकेने बाकीच्या सर्व सीरियल्स ला मागे ठेवले होते. या मालिकेत दाखविण्यात आले होते की, ‘आनंदी’ या चिमुरडीचे एका मोठ्या कुटुंबातील ‘जगदीश’ सोबत कसे लग्न लावून दिले जाते.

हा कार्यक्रम बालविवाहाच्या संकल्पनेवर आधारित होता.बालविवाहानंतर आनंदीला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे या मालिकांमध्ये दाखवले आहे. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि सर्वात आवडलेली भूमिका म्हणजे लहान मुलगी आनंदी.

आनंदीने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली. आनंदि चे पात्र करणाऱ्या त्या लहान मुलीचे नाव अविका गोरे असे आहे. भाविकाने आपल्या अभिनयाने या भूमिकेला चार चांद लावले. बालपणीचा सिक्वेल संपल्यानंतर आनंदीने मालिका सोडली.

यानंतर जेव्हा ती पुन्हा पडद्यावर आली तेव्हा लोक तिला पाहून आश्चर्यचकित झाले. काही वर्षांत ती लहान नसून मोठ्या आणि मॅच्युअर मुलीच्या भूमिकेत दिसली. अविका गोर ने नंतर ‘ससुराल सिमर का’ मध्ये ‘रोली’ चे प्रसिद्ध पात्र साकारले होते. आता अशी माहिती समोर आली आहे कि आपली सरावाची लाडकी आनंदी म्हणजेच अविका लग्न बंधनात अडकनार आहे.

या व्यक्तीच्या पडली आहे प्रेमात

मीडिया रिपोर्टनुसार, अविका लवकरच मनीष रायसिंगानीशी लग्न करणार आहे. आपल्याला सांगतो कि, मनीष ‘ससुराल सिमर का’ मालिकेत अविकाच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. शोच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अविका आणि मनीष अनेकदा कार्यक्रमांना एकत्र दिसले आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवून ठेवले नाही. मनीष रायसिंगानी हा एक गाजलेला टीव्ही अभिनेता आहे आणि बर्‍याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे.

आपल्याला सांगू इच्छितो कि, मनीष हा अविकापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. अविका 22 वर्षांची आहे, तर मनीष 40 वर्षाचा आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की 2020 पर्यंत दोघेही विवाहबंधनात अडकतील. मात्र, यासंदर्भात या दोघांकडून कोणतेही विधान झालेले नाही.

चित्रपटांमध्येही काम केले आहे :

अविका आणि मनीष बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अशा परिस्थितीत दोघांचे चाहते सुद्धा त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत त्यांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे, वास्तविक आयुष्यातली त्यांची जोडीही या मालिकांसारखी हिट राहावी अशी सर्वांची इच्छा आहे.

सध्या अविका कोणत्याही शोमध्ये काम करत नाही. आपल्याला माहिती आहे का 2013 मध्ये रिलीज झालेल्या साऊथच्या ‘अय्याला जम्पाला’ चित्रपटात अविका ने काम केले आहे. चित्रपटातील त्यांचे काम प्रेक्षकांनी खूपच पसंतीस आणले आहे.

Leave a Comment