आपण सुद्धा फेसबुक वर कोणाशी गप्पा मारता…तर पहिला ही गोष्ट जाणून घ्या आणि मगच आपण गप्पा मारा अन्यथा आपल्या सोबत धोका झालाच समजा, आपल्याला माहित असेल की प्रेमात पडलेल्या माणसाला आजुबाजूला काय चाललंय हे दिसतं नाही.
म्हणूनच कदाचित प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला कोणाची पर्वा नसते. प्रेमात लोकं एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच त्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. पण कालांतराने हे खूप बाष्कळपणाचंही वाटत पण त्या वयात हे होतंच आता अशीच काहीशी गोष्ट फेसबुक वर घडली आहे.
जी आपल्याला थोडी विचित्र आणि धक्कादायक नक्कीच वाटेल चला तर जाणून घेऊ कि नेमके काय घडले आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलीने फेसबुकवर एका मुलाशी मैत्री केली. कालातंराने थोड्या गप्पा झाल्यावर ते दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले, आणि यानंतर काही दिवसांनी या दोघांचे लग्न सुद्धा झाले. या लग्नापासून त्यांना एक मूलही झाले.
मात्र, यावेळी त्या मुलीचा नवरा भलत्याच बाईच्या प्रेमात पडला आणि तो आपल्या पत्नीला व बाळाला सोडून पळून गेला. आपणास सांगू इच्छितो की छत्तीसगडची ही गोष्ट आहे. ती पीडित मुलगी आता आपला पती शोधण्यात मग्न असून ती आता पोलीस प्रशासनाची मदत घेत आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या नवऱ्याने पुन्हा लग्न केले आहे.
छत्तीसगडच्या रामगड जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही किरण नावाची मुलगी अजय बेदिया नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली. त्यांनी फेसबुकद्वारे मैत्री केली होती आणि यानंतर काही दिवसांनी या दोघांचे लग्न सुद्धा झाले आणि ते एकत्र राहू लागले. पण लग्नानंतर हा तरूण लगेचच दुसर्या मुलीच्या प्रेमात पडला.
आणि तो तरुण काहीच न सांगता पत्नी व आपल्या 3 वर्षाच्या मुलाला सोडून पळून गेला. आता पीडित मुलगी आपल्या मुलासह पोलिस ठाण्यात दाद मागत आहे. तक्रारी करूनही पोलिस तिला मदत करत नाहीत आणि केवळ आश्वासने देत आहेत, असा या मुलीचा आरोप आहे.
तिची कहाणी सांगत पीडित किरण बेदिया म्हणाली की मी फेसबुकवर अजयशी मैत्री केली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि २०१३ साली आमचे लग्न सुद्धा झाले. पण लग्नानंतर काही दिवसांनी अजय खूप बदलला आणि त्याने मला मारहाण करण्यास सुरवात केली. हे सर्व बरेच वर्षे चालू होते.
पण सन 2017 मध्ये पीडित मुलीला मुलगा झाला. पण मुलगा झाल्यावर अजय जास्तच बदला आणि तो एका दुसर्या मुलीच्या प्रेमात पडला. किरणने पुढे खुलासा केला की तिच्या नवऱ्याने आता दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे आणि तो आता तिच्याबरोबर राहत आहे, त्याने मला सोडले आहे. आता मी न्यायासाठी सर्वत्र भटकत आहे.
पण कोणीही मला मदत करत नाही. किरण सोबतच तिचा भाऊही पोलिस ठाण्यात फिरत आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी अजयवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पीडितेचा भाऊ म्हणतो की आम्ही पोलिस ठाण्याच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. मला फक्त माझ्या बहिणीसाठी न्याय हवा आहे.
त्याचवेळी, रामगढ मुख्यालयाचे डीएसपी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता ते म्हणाले की, पीडितेने याचा अर्ज केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामुळे चौकशीनंतरच कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण सुद्धा कोणाशी सुद्धा मैत्री करताना थोडे सावध रहा. नाहीतर आपला सुद्धा पत्ता कट होऊ शकतो.