आई होण्याची भावना खूपच सुंदर असते. आपल्याला माहित आहे आहे की यावेळी एखादी आई नऊ महिन्यांपर्यंत आपल्या बाळाला पोटात वाढवते. पण कधी अशा काही गोष्टी घडतात ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केला नसतो लोक अद्याप जुळी मुले झाल्यावर खुशीने स्वीकारतात.
परंतु कधीकधी अनेक महिलांना एकाच वेळी सात ते आठ मुले सुद्धा होतात. बहुतेक अशा घटना IVF मध्येच पाहिल्या जातात, परंतु काही दुर्मिळ घटनांमध्ये महिलेला नैसर्गिक पद्धतीने बरीच मुले होऊ शकतात. असाच एक प्रकार नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये समोर आला आहे.
जिथे एक महिला गरोदर होती. पण त्या महिलेचे पोट विचित्रपणे वाढू लागले. तिचे पोट इतके का वाढत आहे हे तिला समजू शकले नाही? शेवटी जेव्हा तिने सोनोग्राफी केली तेव्हा तिला त्याचे कारण समजले. चला तर मग नेमके काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊ.
या महिलेचे नाव नतालि मेरी होते आणि तिचे वय साधारणता ३० वर्षे होते. ही महिला ऑस्ट्रेलियाच्या रोएबॉर्नमध्ये राहत होती. त्या महिलेला आधीच एक मुलगी सुद्धा होती, पण त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली.
परंतु जेव्हा ७ आठवड्यांनंतर तिने सोनोग्राफी केली तेव्हा तिला असे आढळले की तिच्या गर्भात एक नाही, तर तब्ब्ल चार मुले होती. पण तिची ही गर्भधारणा नैसर्गिकरित्या झाली होती. एक वृत्तानुसार नताली आणि तिचा नवरा बर्याच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करीत होते. परंतु काही कारणास्तव नताली गर्भवती होऊ शकत नव्हती.
तथापि, काही वर्षांच्या सतत उपचारानंतर नताली गर्भवती झाली आणि तिला एक मुलगी सुद्धा झाली. परंतु दोन वर्षांनंतर नताली अचानक पुन्हा गरोदर राहिली. परंतु त्यांना काय माहित होते की ही गर्भधारणा त्यांच्यासाठी इतका धक्का देईल.
नताली जेव्हा सोनोग्राफीसाठी गेली तेव्हा तिला दोन हार्ट बीट्स ऐकू येत होते. तिला प्रथम असे वाटले की तिच्या गर्भात जुळी मुले आहेत पण खरं तर तसे नव्हते. नतालीच्या ग र्भाशयात चक्क चार मुले होती. पण यानंतर नतालीच्या पोटाचा आकार प्रचंड वाढू लागला. तिला अगदी कपडे सुद्धा घालण्यात अडचण येऊ लागली.
सरतेशेवटी, सीझेरियनच्या माध्यमातून नतालीने अखेर या चारही मुलांना जन्म दिला. पण अचानक आपल्या कुटुंबातील चार सदस्यांची वाढ झाल्यामुळे त्या जोडीला बऱ्याच अडचणी येऊ लागल्या. नतालीला त्या मुलांना खाऊ घालायला तिचा प्रचंड वेळ जाऊ लागला.
कधीकधी तिची मुले झोपणार नाहीत, तर कोणी रडतच बसणार, त्यामुळे या दोघांना सुद्धा खूप त्रास होऊ लागला. त्याच वेळी, नतालीने तिच्या चार मुलांना जन्म दिल्यानंतर तिच्या पोटाच्या अनेक समस्या येऊ लागल्या. नतालीचे पोट वाढण्याची बरीच कारणे होती.
ती आपल्या पोटाचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर करत होती. नताली म्हणाली की शरीराच्या सकारात्मकतेकडे जाणारी ही तिची पहिली पायरी आहे. चार मुलांना जन्म दिल्यानंतर तिचे पोट लक्षणीय वाढले होते, जे गरोदरपणानंतर असे होतेच. पण तिला याबाबतीत थोडे सुद्धा दुःख नव्हते.