पतीला सोडून 2 मुलांसह ट्रेन मधून गायब झाली हि महिला, कारण समजल्यावर पोलीस सुद्धा लागले रडायला पहा…’

आपल्याला कदाचित माहित नसेल पण आम्ही ही विचित्र अशी घटना सांगू आपल्याला सांगू इच्छितो, नुकतीच छपरा-टाटा एक्स्प्रेसमधून दोन मुलांसह हरवलेल्या पूजा देवी ही महिला पुन्हा समस्तीपूर रेल्वे स्थानकात दाखल झाल्या.

खरं तर ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या मुलां समवेत गायब झाली होती, पण ती अचानकच काल समस्तीपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली. पूजाला पाहून पोलिस अधिकाऱ्यांनी ही सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी आवश्यक त्या गोष्टीची चौकशी करून त्या महिलेला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी पूजा देवीला तिच्या गायब होण्याचे कारण विचारले असता पूजा देवीने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या दोन मुलांसमवेत आसनसोल स्टेशनवर वस्तू खरेदी करण्यासाठी काही काळासाठी उतरली होती. ती पुढे म्हणते की ती खाली उतरल्यानंतरच ट्रेन सुटली आणि मग तेव्हा खूप विचार करून पूजा देवीने आपल्या मावशीच्या घरी जाण्याचे ठरविले.

यानंतर पोलिस प्रशासनाच्या मदतीने ती शनिवारी दुपारी समस्तीपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. पूजा देवी अशा मार्गाने गायब झाल्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत आणि पूजा देवीचा फोन का बंद होता हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. तसेच, जेव्हा ती ट्रेनमधून काही सामान घेण्यासाठी खाली उतरली.

तेव्हा तिने सर्व सामान आपल्याबरोबर का घेतले. तर ती आपल्या दोन मुलांसह का पळून गेली? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते पण त्यावेळी पूजा देवीच्या वतीने काहीही बोलले गेले नाही.

पतीने पोलीस ठाण्यात केस केली:-

लॉकडाऊन दरम्यान पूजा देवी तिच्या मावशीकडे होती आणि नुकतीच ती बुधवारी तिच्या पती संदीप सोबत ट्रेनमधून सासरच्या घरी येत होती. पत्नी व मुले बेपत्ता झाल्यानंतर संदीपने पत्नी, मुले तसेच आपली दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे सांगून पोलिसांना अर्ज दिला होता आणि तेव्हा पूजाचा फोनही बंद होता.

तपासादरम्यान पोलिसांना लवकरच या महिलेचा शोध लागला आणि शनिवारी पोलिसांनी पूजा देवीला समस्तीपूर रेल्वे स्थानकात आणले. पूजा वैशाली या गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तिच्या आजीच्या मदतीने पूजाला पोलिस ठाण्यात बोलावले.चौकशीनंतर पोलिसांनी पूजा देवीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

पण पूजा अशा प्रकारे अचानक कशी गायब झाली आणि त्यामागे काय कारण होते किंवा तिचा काही हेतू होता याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत, या प्रकरणांमुळे पोलीस देखील खूप अश्यर्यचकित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.