पतीने करवा चौथ च्या व्रताला मॅचिंग बांगड्या आणल्या नाही म्हणून पत्नीने केलं असं काही जे पाहून मोठ्याने रडायला लागला पती…’

नुकतेच उत्तर प्रदेशमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जेथे एका पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कारण तिच्या पतिने तिला बांगड्या दिल्या नाहीत. वास्तविक, अनेक महिलानी करवा चौथचा उपवास ठेवला होता.

आणि यूपीच्या चांदौली जिल्ह्यातील या एका महिलेने सुद्धा करवा चौथची तयारी केली होती. या महिलेने सुद्धा अगदी आनंदाने स्वत: साठी नवीन साडी सुद्धा घेतली होती आणि या साडीसह तिला मॅचिंग बांगड्या घालाव्यात अशी या महिलेची इच्छा होती.

पण तिच्या नवऱ्याने मॅचिंग होणाऱ्या बांगड्या खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेने सरळ आपल्या पतीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या महिलेने तक्रार नोंदविली आणि तिच्या पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

त्याचवेळी या महिलेची तक्रार ऐकून पोलिस सुद्धा दंग झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिशन शक्ती अंतर्गत असे अनेक प्रकार घडले आहेत. जेथे महिला आपल्या पतींबद्दल तक्रारी करत आहेत. मांझवार रेल्वे स्थानकाजवळ एका कॉलनीत राहणारी महिला पतीच्या वागण्यामुळे संतप्त झाली होती.

त्यानंतर तिने थेट पोलिस ठाणे गाठले आणि तिने आरोप केला की करवा चौथसाठी आपल्या नवऱ्याने मॅचिंग होणाऱ्या बांगड्या व इतर वस्तू सुद्धा दिल्या नाहीत. त्यामुळे तिला गुन्हा दाखल करायचा आहे. या महिलेची तक्रार ऐकून आधी पोलिस सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिसांनी कसे तरी या महिलेला समजावले.

गॅसबद्दल तक्रार:-

असेच गॅस स्टोव्हसह एक प्रकरणही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने आपल्या नवऱ्याबद्दल पोलिसांत तक्रार दिली आहे. या महिलेचा आरोप आहे की तिचा नवरा तिला गॅसवर जेवण करू देत नाही. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा गॅस ऐवजी मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास भाग पाडतो.

या पतीच्या मागणीला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, आपल्या पतीचा दृष्टीकोन चांगला नाही आणि घरात गॅस सिलिंडर असताना सुद्धा तिचा नवरा तिला गॅस वापरु देत नाही.

हेल्प डेस्कवर तैनात कॉन्स्टेबल सुनिधी सिंह, कुसुम आणि मानसी सिंह यांनी या दोन्ही प्रकरणांची माहिती दिली आणि सांगितले की या दोन महिलांना समजवून त्यांना परत पाठविण्यात आले असल्याचे समजते. या महिलांच्या नवऱ्यांना सुद्धा त्यांचे घर व्यवस्थित चालवावे, असे स्पष्ट केले आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही प्रकरणे मिशन शक्ती अंतर्गत येत आहेत आणि यामध्ये बहुतेक कौटुंबिक वाद आणि जमीन संबंधित बाबी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मदत डेस्कवर आतापर्यंत अशी 13 प्रकरणे समोर आली आहेत.

आणि यातील पोलिसांनी बहुतांश प्रकरणे निकाली काढली आहेत. तथापि, ही सर्व प्रकरणे संगणकात नोंदविली जात आहेत आणि डेटा बेस तयार करुन उच्च अधिकाऱ्यांना पाठविला जात आहे. विशेष म्हणजे यूपीमध्ये या दिवसांत मिशन शक्ती योजना सुरू केली गेली आहे.

ज्या अंतर्गत महिलांना मदत केली जात आहे. तथापि, यामुळे बऱ्याच महिला किरकोळ वाद घेऊन पोलिस ठाण्यात येत आहेत.

Leave a Comment