पडद्यावर दामिनी बनून मीनाक्षी ने लोकांच्या डोळ्यात आणले होते पाणी,पण आज रस्त्यावरून चालली तरी कोणी ओळखत नाही झालीय अशी अवस्था…’

ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पड़ता है तो वो आदमी उठता नहीं उठ जाता है… .सनी देओलचा हा डायलॉग सर्वांनाच आठवत असेल, पण तो डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे हे आठवते का? या चित्रपटाचे नाव होते ‘दामिनी’ या चित्रपटात सनी देओल, ऋषि कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसले होते.

चित्रपटामध्ये पुरुष तार्‍यांच्या जोरदार भूमिका होत्या, पण त्या सर्वांवर मीनाक्षी शेषाद्री भारी पडली होती तिने दामिनीची भुमिका केली होती. त्या काळात मिनाक्षी सुपरस्टार बनली होती, पण आज ती अशी झाली आहे की तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

चित्रपटांमध्ये येणार नव्हती मीनाक्षी

मीनाक्षीने वयाच्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला होता, परंतु त्यावेळी तिचे नाव शशिकला शेषाद्री म्हणून ओळखले जात असे. मिस इंडिया झाल्यानंतर तिचा फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आला. त्याच वेळी मनोज कुमारची तिच्यावर नजर गेली आणि त्यांनी ठरवले की त्यांच्या ‘पेंटर बाबू’ या चित्रपटाची नायिका मीनाक्षीच असेल.

तिची स्क्रीन टेस्ट न करताच मीनाक्षीला या चित्रपटासाठी साइन केले गेले होते. त्यावेळी एक समस्या आली होती, तिचे नाव शशिकला होते आणि या नावाची अभिनेत्री आधीच इंडस्ट्रीमध्ये हजर होती आणि ती प्रसिद्ध देखील होती. त्यावेळी तिचे नाव बदलून शशिकला शेषाद्री वरून मीनाक्षी असे करण्यात आले. परंतु ‘पेंटर बाबू’ चित्रपट फ्लॉप झाला. पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मीनाक्षीचा हिंदी चित्रपटांमधून रस गेला आणि तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

दामिनीने तिच्या करिअरला उंच केले

मीनाक्षी बॉलिवूड सोडून जाणारच होती तेव्हा तिला हिरो हा चित्रपट मिळाला. शोमन सुभाष घई आपल्या हिरो या चित्रपटासाठी एका नवीन आणि सुंदर चेहर्याच्या शोधात होते आणि त्यांचा शोध मिनाक्षीवर येउन संपला. मीनाक्षी या भूमिकेसाठी तयार नव्हती, पण सुभाष घईने तिला विनंती केली आणि त्यानंतर मीनाक्षीने चित्रपट करण्यास सहमती दर्शविली.

तिचा चित्रपट सुपरहिट होईल आणि ती इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवेल, याची खुद्द मीनाक्षीलाही कल्पना नव्हती. 1933 मध्ये रिलीज झालेला हिरो हा चित्रपट ब्लॉकबस्टर फिल्म म्हणुन समोर आला आणि मीनाक्षी रात्रीतून इंडस्ट्रीमधिल सर्वात लोकप्रिय स्टार बनली.

त्यावेळी या चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली होती, त्या दिवसांनुसार ती खुप मोठी रक्कम होती. त्या काळात फक्त बिग बीचे चित्रपटच कोटीने कमवत असत. यानंतर मीनाक्षीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्यास सुरुवात केली.

लाईमलाइट पासुन दुर राहते मीनाक्षी

मीनाक्षीची अमिताभबरोबरची जोडीही चांगलीच पसंत झाली होती. या दोघांनी शेनशाह, गंगा जमुना सरस्वती, तूफान,अकेला या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि मीनाक्षी सर्वांची आवडती बनली होती. 80 च्या दशकात मीनाक्षी इतकी चमकदार अभिनेत्री बनली की तिने त्याकाळात ती श्रीदेवीला टक्कर देणारी अभिनेत्री बनली होती.

त्यानंतर, तिच्या जीवनात सर्वात शक्तिशाली चित्रपट आला तो म्हणजे दामिनी ज्याच्या कथेने पडद्यावर आग लावली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेअरच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. 1996 मध्ये मीनाक्षीने सनी देओल सोबत घातक चित्रपटात काम केले आणि हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

तिने बरेच हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. पण हिरो आणि दामिनीमुळे ती नेहमीच आठवणीत राहिली. त्यानंतर चित्रपटांमधून गायब झाल्यानंतर ती लाइमलाइटपासून दूर गेली. मीनाक्षीने 1995 मध्ये इन्वेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेच्या टेक्सास शहरात स्थायिक झाली.

Leave a Comment