दोन सख्या भावांनी केले दोन सख्या बहिणींशी लग्न, लग्नाच्या तिसऱ्याच रात्री या दोघींनी केला असा कांड जो पाहून रडायला लागले दोघ भाऊ..’

लग्नात जेव्हा मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये पैशाचा किंवा दुसऱ्या गोष्टीच देवान-घेवान केले जाते तेव्हा ते लग्न नसून एक प्रकारची तडजोड असते.

पण कधीकधी त्या मुलाच्या कुटूंबाची चुकी नसतानाही त्यांना अडचणीला सामोरे जावे लागते. राजस्थानमधील एका कुटूंबाच्या बाबतीतही असेच घडले आहे.

आपण डॉली की डोली हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल, ज्यात एक वधू ‘सोनम कपूर’ लग्न करते आणि आपल्या वडिलांसोबत वधूचे घर लुटते. हे इतरही काही चित्रपटांमध्ये दर्शविले गेले आहे, परंतु जेव्हा वास्तविक जीवनात असे घडते तेव्हा त्या व्यक्तीस खूप त्रास सहन करावा लागतो.

कारण तो कष्टातून मिळालेला पैसा असतो आणि त्या व्यक्तीची समाजामध्ये इज्जत सुद्धा कमी होते. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे तेव्हा एकत्र आलेल्या दोन नववधूंनी संपूर्ण घर लुटले, त्यानंतर त्या वरांचे उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल की हे लग्न झाले नसते तर बरं झाल असत.

दोन वधू एकत्र आल्या आणि त्यांनी संपूर्ण घर लुटले:-

राजस्थानच्या जयपूरमधील एका खेड्यात राहणाऱ्या गजानंदने अलवर येथील चौथमल याच्याशी संपर्क साधला आणि तिथे त्याने आपल्या दोन्ही भावाच्या लग्नाबद्दल चर्चा केली. चौथमल आपल्या दोन भावासोबत अलवर येथील सुरेश सैनी ‘मुलींचा भाऊ’ यांच्या घरी पोहोचले.

आणि दोन्ही मुलींची ओळख आपल्या भावाशी रामनारायण व राजेश यांच्याशी करून दिली. चौथमलने सुरेशसमोर या लग्नासाठी ११ लाख रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी त्याच्या भावांनी लग्न कार्यालयात त्या मुलींशी लग्न केले.

या करारानुसार सुरेशने चौथमलला ११ लाख रुपये दिले तर लग्न सोहळ्यातही ९ लाख रुपयेही खर्च झाले होते. लग्नानंतर एक-दोन दिवस चांगलेच गेले होते, पण लग्नाच्या ४ दिवसानंतर त्या वधूनी त्याच्या पतीला दुधात झोपेच्या गोळ्या घालून ते दूध त्यांना प्यायला दिले.

जेव्हा दोन्ही वर बेशुद्ध झाले तेव्हा दोघींनी आपल्या भावाने दिलेले ११ लाख रुपये आणि लग्नसोहळ्यात खर्च झालेले ९ लाख रुपये आणि काही रुपये व सर्व दागिने घेऊन पळून गेलीत.

चौथमल यांनी गजानंद, सुरेश आणि त्या नववधू विरोधात हरमाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या आरोपींचा शोध सुरू केला होता.

नववधू रामनारायण आणि राजेश यांनी सांगितले होते की पहिल्या दिवशी दोघेही प्रेमाने बोलले, दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व काही व्यवस्थित चालले होते, म्हणून त्यांनी त्या महिला असल्यामुळे त्यांना आपल्या घराच्या चाव्या दिल्या होत्या.

पण चौथ्या दिवशी त्यांनी आम्हाला दूध प्यायला दिले आणि त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. यानंतर आम्ही ते दूध प्यायल्यामुळे आम्ही बेशुद्ध झालो होतो.

आणि सकाळी जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा घरातले सर्व सामान विखुरलेले होते आणि त्या दोघी सुद्धा घरी नव्हत्या तेव्हा आमच्या दोघांना समजले की आमची फसवणूक झाली आहे.

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत:-

दरोडेखोर नववधूची दहशत आजची नाहीतर, याच्या आधी कितीतरी कुटुंबे त्याच्यामुळे दु:खी झाली आहेत. आपल्याला कदाचित माहित नसेल पण दलाल किंवा अनोळखी विवाह ब्युरोद्वारे लग्न करणाऱ्या लोकांशी असे होते.

गेल्या तीन वर्षात राज्यात सुमारे १०० अशा घटना घडल्या असून, २ कोटी रुपये आणि दागिने लुटले गेले आहेत. मागील वर्षी भाजप सरकारच्या काळात विधानसभेतही दरोडेखोरांची प्रतिध्वनी दिसून आली होती. त्यावेळी आमदार नंदकिशोर महारिया यांनी दरोडेखोर वधूंचा मुद्दा उपस्थित केला होता.

आणि तत्कालीन गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सभागृहात सांगितले होते की इतर राज्यातील मुली येथे दलालांमार्फत लग्न करण्यासाठी येतात आणि अशा अनेक घटना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंदवल्या जातात.

 

Leave a Comment