असे म्हणतात की, महाविद्यालयीन काळात रणवीर ज्या मुलीच्या प्रेमात वेडा होता तिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपचे कारण आदित्य रॉय कपूर आहे. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने नुकताच आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. रणवीरचे नाव बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये मोजले जाते कारण त्याने एकापेक्षा जास्त हिट चित्रपट केले आहे.
यात रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गुंडे, गली बॉय यांचा समावेश आहे. यातील बहुतेक चित्रपटांमध्ये रणवीर आणि दीपिका यांची जोडी सोबत होती. या दोघांचीही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आज रणवीर दीपिकाचा नवरा असला तरी एक काळ असा होता की त्याचे नाव इतर बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडले जात होते.
त्याचवेळी एक मुलगी होती, जिच्या प्रेमात रणवीर वेडा झाला होता परंतु तिचे आता लग्न झाले आहे आणि ती एका मुलाची आई देखील बनली आहे. चला तर जाणून घ्या रणवीरच्या त्या प्रेमाबद्दल जे फारच कमी लोकांना माहीत आहे.
रणवीरला अहाना देओल आवडत होती
दीपिका आणि अनुष्कापूर्वी रणवीर एका दुसर्या मुलीच्या प्रेमात वेडा होता हे फारच कमी लोकांना माहीत असेल. रणवीर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओलच्या प्रेमात वेडा होता. दोघांनीही बरेच दिवस एकमेकांना डेट केले होते. रणवीर आणि अहानाचे अफेअर कॉलेजमध्ये सुरू झाले होते. मात्र, या दोघांच्या नात्यात आदित्य रॉय कपूर आला आणि हे नातं तुटले.
काही दिवस रणवीरला डेट केल्यानंतर अहानाने आदित्य रॉय कपूरला डेट केले. हे नातेही लवकरच तुटले. यानंतर रणवीरने कॉफी विथ करण शोमध्ये या प्रेमाविषयी अनेक खुलासे केले. रणवीरने सांगितले होते की आदित्य कॉलेज मध्ये खूप प्रसिद्ध होता आणि प्रत्येक मुलगी त्याच्याबद्दल विचार करायची. त्यावेळी मीसुद्धा एका मुलीच्या प्रेमात वेडा होतो जी आता एका मुलाची आई झाली आहे.मी चार-पाच वर्षे तिच्या प्रेमात वेडा होतो, परंतु तिने माझ्यासोबत ब्रेकअप केले. तिने असे आदित्यमुळे केले होते.
आदित्य सोबत ब्रेकअप करुन वैधवसोबत लग्न केले
अहानाने 2 फेब्रुवारी 2014 रोजी वैधव वोहरा सोबत सात फेरे घेतले. त्यांना आता एक गोंडस मुलगा आहे. विशेष म्हणजे अहाना देओलचे संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिची बहीण ईशा देओलनेही बरेच चित्रपट केले आहेत, परंतु अहाना लाइमलाइटपासून दूर राहिली. आता ती आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.
दुसरीकडे रणवीर सिंगचे नाव बी-टाउन मधील इतर अभिनेत्रींशीही जोडले गेले आहे. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या वेळी रणवीर सोनाक्षीसोबतच्या अफेयरविषयी चर्चेत होता. बर्याच वेळा दोघांना हातात हात घालुन सोबत पाहिले गेले. टोरंटो च्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघे एकत्र दिसले होते. मात्र या दोघांनी कधीही या नात्याला काहीही नाव दिले नाही.
रणवीरचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे
त्याचवेळी परिणीती चोप्राबरोबरही रणवीरचे नाव जोडले गेले. दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात होती. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’मध्ये परिणीती चोप्रा रणवीरची को-स्टार होती. अशा परिस्थितीत त्या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने काही सांगितले नाही.
दीपिकाला आपली जीवनसाथी बनवण्यापूर्वी रणवीर अनुष्का शर्मासोबत असलेल्या अफेयरविषयी चर्चेत होता. असे मानले जाते की दोघेही एकमेकांबद्दल बरेच गंभीर होते. मात्र रणवीरने दीपिकाकडे अधिक झुकण्यास सुरवात केली म्हणुन अनुष्का त्याच्या पासून दुर गेली. असे म्हटले जाते की त्यावेळी दीपिका या कारणामुळे अनुष्कासोबत मैत्रीदेखील ठेवत नव्हती.
परंतु रणवीर दीपिकाच्या लग्नानंतर हा अंतर्गत कलहही संपला. आता रणवीर दीपिकासोबत लग्न करून आनंदी आहे, तर अनुष्का विराटसोबत तिच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे.