जाणून घ्या किती करोडची मालकीण आहे श्रद्धा कपूर, एका चित्रपटासाठी घेते इतकी मोठी फीस

श्रद्धा कपूर बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता शक्ती कपूरची मुलगी आहे. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरी आहे. श्रद्धाने बॉलीवूडमध्ये २०१० मध्ये तीन पत्ती या चित्रपटामधून पदार्पण केले होते.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही तथापि चित्रपटामधील श्रद्धाच्या कामाचे खूपच कौतुक झाले होते. यानंतर श्रद्धा लव का द एंड या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती पण हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप राहिला होता.

श्रद्धाला बॉलीवूडमध्ये खरी ओळख आशिकी २ या चित्रपटामधून मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिला बॉलीवूडमधील ए लिस्टमधील कलाकारांमध्ये गणले जाऊ लागले होते.

यानंतर श्रद्धाने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट करत गेली.

सध्या श्रद्धाजवळ अनेक चित्रपटांचे प्रोजेक्ट आहेत. अशामध्ये सध्या बॉलीवूडमध्ये तिची चांगलीच कमाई होत आहे. चित्रपटांशिवाय श्रद्धा ब्रॅण्डचे प्रमोशन करून सुद्धा बक्कळ पैसा कमावते.

श्रद्धा एक उत्कृष्ठ अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्कृष्ठ सिंगर देखील आहे. ३ मार्च १९८७ मध्ये जन्मलेली श्रद्धा आता ३३ वर्षांची झाली आहे आणि ती आज एक इंडीपेंडेंट मुलगी आहे.

ती फक्त आपल्या कमाईवर खर्च करत असते. वयाच्या ३३ व्या वर्षी श्रद्धा करोडो रुपये कमावते. चला तर आज तिच्या एकूण संपत्ती बद्दल जाणून घेऊयात.

किती कमावते श्रद्धा कपूर?

सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ३ ते ४ करोड रुपये इतकी फीस घेते.

बातमीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये श्रद्धा कपूरच्या एकूण संपत्ती मध्ये ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा २०१८ चा आहे. श्रद्धाला लक्झरी कार देखील खूप आवडतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल कि श्रद्धा कपूरजवळ ९० लाख रुपयांची स्वांसी मर्सिडीज एमएल क्लास एसयूवी सुद्धा आहे.

श्रद्धा चैरिटीसुद्ध तितकीच भरभरून करते. ती वेळोवेळी अनेक सामाजिक कामेदेखील करत असते. चित्रपटांमध्ये, जाहिराती आणि गायनाव्यतिरिक्त श्रद्धा लाईव शोमध्ये सुद्धा परफॉर्म करून पैसा कमावते.

श्रद्धा जेव्हा कोणत्याहि फॅशन शोमध्ये किंवा कोणत्याही शॉपची ओपनिंग करते तेव्हा त्याचा ती वेगळा चार्ज घेते.

श्रद्धा कपूरचे कौशल्य येथेच संपत नाही तर तुम्हाला हे जाऊन आश्चर्य वाटेल कि श्रद्धा जेव्हा १२ मध्ये शिकत होती तेव्हा तिला ९५ टक्के मार्क्स पडले होते. तिच्या आईवडिलांची अशी इच्छा होती कि श्रद्धा कपूरने टीचिंगमध्ये जावे पण तिला एक अभिनेत्री बनायचे होते.

श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वी स्ट्रीट डांस ३डी हा चित्रपट आला होता. तथापि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

यानंतर श्रद्धा कपूर बागी ३ मध्ये टाइगर श्रॉफसोबत दिसली होती. हा चित्रपटसुद्धा काही खास चालू शकला नाही. श्रद्धाने बराच काळ झाला सुपरहिट चित्रपट दिलेला नाही पण असे असूनही तिच्या स्टार पॉवर वर जरासुद्धा परिणाम झालेला नाही.

तिला चित्रपट देखील भरभरून मिळत आहेत आणि ती पैसा देखील खूप कमवत आहे.

Leave a Comment